शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी अनिता शेटे या महिलेची निवड करून आपण खूप पुरोगामी होत आहोत, असे दाखविण्याचा प्रयत्न देवस्थानने केला असला तरी तो केवळ देखावाच ठरणार आहे.
सोनई – शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी अनिता शेटे या महिलेची निवड करून आपण खूप पुरोगामी होत आहोत, असे दाखविण्याचा प्रयत्न देवस्थानने केला असला तरी तो केवळ देखावाच ठरणार आहे. कारण संस्थानच्या अध्यक्षपदी महिलेची निवड झाली तरीही शनिदेवाच्या चौथ-यावर महिलांना प्रवेश मिळणार नाही, असे नवनिर्वाचित अध्यक्षा अनिता शेटे यांनी ‘प्रहार’शी बोलताना सांगितले.
एका महिलेने महिन्यांपूर्वी चौथ-यावर प्रवेश करून शनिदेवाला तेलाचा अभिषेक केल्यानंतर मोठा गदारोळ









