पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for June, 2015

 बुडत्या जहाजातून 20 कर्मचार्‍यांना वाचवण्यात नौदलाला यश 0

बुडत्या जहाजातून 20 कर्मचार्‍यांना वाचवण्यात नौदलाला यश

CIE7G1mUYAEtQq7
मुंबई- जवळच्या समुद्रात बुडणार्‍या एका जहाजावरच्या 20 कर्मचार्‍यांची भारतीय नौसेने थरारकपणे सुटका करण्यात आली आहे. जिंदल कामाक्षी या खाजगी जहाजातून 20 कर्मचार्‍यांची सुखरूप सुटका करण्यात आली.
वसईपासून 80 कीलोमीटर खोल आणि 40 नॉटीकल मैलावर समुद्रात जिंदाल कामाक्षी जहाजात काल रात्री काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे जहाज मध्येच बंद पडले. हे जहाज मुंबई बंदरात येत होते. पण उधाणलेल्या समुद्रात मध्येच बंद पडल्यामुळे आपत्कालीन परीस्थीती निर्माण झाली. त्यानंतर नौदलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेण्यात आले. मात्र, रात्री पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत होते.
त्यानंतर लगेचच नौसेनेनं सीकिंग हेलिकॉप्टर आणि आयएनएस मुंबई या लढाऊ विमानाच्या मदतीने जहाजातील कॅप्टनसह 20 कर्मचार्‍यांना नौदलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. या सर्व कर्मचार्‍यांना कुलाबा इथल्या INS शिक्रा या नौदलाच्या तळावर आणण्यात आलं आहे. तसंच बंद पडलेलं जहाज भरकटू नये यासाठी नौदलाने एक बोट ही तैनात केली आहे.

June 22, 2015 in मुख्य पान
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार 0

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

NERAL
रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील नेरळ येथील मोहाची वाडी इथे घराची भिंत कोसळून 5 जण ठार झाल्याची घटना घडली आहे.
मुसळधार पावसाने आता बळी घ्यायला सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळील नेरळ येथील मोहाची वाडी इथे घराची भिंत कोसळून 5 जण ठार झाल्याची घटना घडली आहे.या घटनेत एकाच घरातील चारजणांचा मृत्यू झाल्याचे समजते. पहाटे साडेपाच वाजेची ही घटना आहे. किसन दिघे, सुनंदा दिघे, जाईबाई कदम, अर्चना दिघे यांचा मृत्यू झाला आहे.
सलग सुरू असणार्‍या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईसह रायगड परिसरातही पावसाने धुमाकूळ घातला आहे. रायगड जिल्ह्यात 24 तासातसरासरी 137 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.

दाभोळमध्ये दरड कोसळली, 7 जण गाडले गेल्याची भीती 0

दाभोळमध्ये दरड कोसळली, 7 जण गाडले गेल्याची भीती

download
रत्नागिरी – जिल्ह्यातल्या दाभोळमध्ये दरड कोसळली आहे. या दरडीखाली 7 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. टेमकरवाडी परिसरात ही दरड कोसळली असून दरडीखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
रत्नागिरी परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून सततच्या पावसामुळे काल मध्यरात्री 2:30 वाजता दाभोळ मळेवाडीत दरड कोसळली आहे. अजूनपर्यंत जीवितहानीचं कोणतंही वृत्त नाही. मात्र, दरडीखाली एका घरातले 5 जण तर दुसर्‍या घरातले 2 जण असे 7 जण अडकले असल्याचा संशय आहे.
सुभाष पुरकर यांच्या घराच्या बाजूला दरड कोसळली. त्याच्या शेजारच्याच राजेंद्र हारेकर यांच्या घरातील एका खोलीवर दरड पडली. खोलीत त्यांच्या दोन मुली आणि आई झोपल्या होत्या. दरड पडल्यावर त्यांनी ओढून बाहेर काढण्यात आलं आणि ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. तर अडकल्यांना वाचवण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं दरड बाजूला करण्याचं काम सुरू आहे. पण पाऊस असल्यामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत.

 

मध्यप्रदेशातील पत्रकाराला वर्ध्यात जिवंत जाळलं 0

मध्यप्रदेशातील पत्रकाराला वर्ध्यात जिवंत जाळलं

sandip-kothari-murder-case
नागपुर – उत्तरप्रदेशमध्ये पत्रकाराला जिवंत जाळण्याची घटना ताजी असताना वर्ध्यात पुन्हा एका पत्रकाराला जिवंत जाळून ठार मारण्याची खळबळजनक घटना घडलीये. संदीप कोठारी असं या पत्रकाराचं नाव आहे. संदीप कोठारी यांचं मध्यप्रदेशमधून अपहरण करून वर्ध्यात बुटीबोरी इथं जिवंत जाळून हत्या करण्यात आली. या प्रकरणी विशाल तांडी आणि ब्रजेश डहरवाल या दोन आरोपींना अटक करण्यात आलीये. तिसरा आरोपी फरार आहे. चिटफंड कंपन्या, भू-माफिया आणि अवैध मायनिंग माफियांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे.
19 जून रोजी संदीप कोठारी यांचं मध्यप्रदेश जिल्ह्यातील बालघाटमधून अपहरण करण्यात आलं होतं. संदीप कोठारी संध्याकाळी आपल्या घरी परतत असताना रात्री 9.30 च्या सुमारास आरोपी विशाल तांडी आणि ब्रजेश डहरवाल यांनी त्यांचं अपहरण केलं. संदीप यांना एका कारमध्ये बसवून बालघाटपासून दोन किलोमिटर अंतरावर वर्ध्या जिल्ह्यातील बुटीबोरी परिसरात रेल्वे ट्रॅकजवळ आणून मारहाण केली आणि जिवंत पेटवून दिलं.
आरोपी एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी मृत संदीप कोठारी यांना घटनास्थळीच जमिनीत पुरण्याचा प्रयत्न केला. दुसर्‍या दिवशी घटनास्थळापासून जवळच असलेल्या सिंधी स्टेशन पोलिसांना बेवारस मृतदेहाची माहिती मिळाली. पोलिसांनी संदीप कोठारी यांचा मृतदेह अज्ञात समजून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला होता. पण, रात्री उशीर झाल्यामुळे शवविच्छेदन होऊ शकलं नाही. अखेर बालघाट पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. या प्रकरणी पोलिसांनी चिटफंड कंपनीशी संबंधीत असलेल्या विशाल तांडी आणि जमीन व्यवहाराशी संबंधी असलेल्या बुटीबोरी येथील रहिवाशी ब्रजेश डहरवाल या दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतलं. अगोदर दोघांनी उडवा उडवीची उत्तर दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच दोघांनी संदीप कोठारी यांचं अपहरण आणि हत्येची कबुली दिली.
संदीप कोठारी यांनी चिटफंड आणि अवैध जमीन व्यवहार प्रकरणी आरोपी विशाल तांडी आणि ब्रजेश डहरवाल यांच्याविरोधात तक्रार
केली होती. विशाल तांडीच्या विरोधात राजस्थान जिल्ह्यातील उदयपूर येथील हिरणमगरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलाय. तर दुसरा आरोपी ब्रजेश डहरवालच्या विरोधात संदीप यांनी जमीन गैरव्यवहाराची तक्रार दिली होती. त्याचबरोबर मायनिंग माफियांच्याविरोधातही संदीप कोठारी यांनी आवाज उठवला होता. आपल्या विरोधात तक्रार दिला याचा राग धरून आरोपींनी हत्या केल्याचं कबूल केलंय. या प्रकरणी राकेश नर्सवाली हा तिसरा आरोप अजूनही फरार असून पोलीस अधिक तपास करत आहे.

June 22, 2015 in मुख्य पान
दहावीचा निकाल जाहीर 0

दहावीचा निकाल जाहीर

Maharashtra-SSC-Board
मुंबई/पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत राज्याचा एकूण निकाल ९१.४६ टक्के लागला आहे. पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मंडळाकडून ही माहिती देण्यात आली.
नेहमीप्रमाणे यंदाही कोकण विभागाचे सलग चौथ्या वर्षी पहिला क्रमांक पटकावला आहे. या परिक्षेत मुलींनीच बाजी मारली असून तब्बल ९२.९४ टक्के मुली तर ९०.१८ टक्के मुले दहावीच्या परीक्षेत यशस्वी झाली आहेत. राज्याचा एकूण निकाल ९१.४६ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी राज्याचा एकूण निकाल ८८.३२ टक्के लागला होता. गेल्या चार वर्षापासून दहावीच्या निकालात निर्माण केलेला ‘कोकण पॅटर्न’चा दबदबा यंदाही कायम असून बारावीप्रमाणे दहावीतही कोकण विभागाने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. सर्वाधिक निकालाचा मान राज्यात कोकण विभागाने (९६.५४ टक्के) मिळवला तर लातूर विभागाचा सर्वात कमी ८६.३८ टक्के निकाल लागला.राज्यात ४७३१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून २१ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ८७.४६ टक्के लागला. यंदा मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतून १७ लाख ३२ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

June 08, 2015 in मुख्य पान
पालघरजवळ भीषण अपघातात, चार महिलांचा मृत्यू 0

पालघरजवळ भीषण अपघातात, चार महिलांचा मृत्यू

Palghar-Accident
मुंबई- अहमदाबाद महामार्गावर सोमवारी पहाटे टाटा मॅजिक आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघात चार महिलांचा मृत्यू झाला.
पालघर येथील नवझे गावातील एका गरोदर महिलेच्या पोटात दुखू लागल्यामुळे तिला तात्काळ उपचारासाठी टाटा मॅजिक रिक्षातून रुग्णालयात नेण्यात येत होते. त्यावेळी चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने रिक्षा वरई रस्त्यावरील गुंदावे येथे रस्त्याकडेला उभ्या असलेल्या रेतीच्या ट्रकवर जाऊन आदळली. पहाटे साडेतीनच्या सुमारास झालेल्या या अपघातात गर्भवती महिलेसह अन्य तीन महिलांचा मृत्यू झाला.भारती भरत पाटील (आशा), भानुमती भाऊ लाबड, संगीता कल्पेश चिमडा आणि यमुना उध-या दोड अशी या अपघातात ठार झालेल्या महिलांची नावे आहेत.

June 08, 2015 in मुख्य पान
चित्त थरारक स्टंट 0

चित्त थरारक स्टंट

bike1

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स या तरुणांच्या ग्रुप ने रविवारी दिनांक ७ जून रोजी नन्दूरकर महाविद्यालयाच्या मैदानावर यवतमालकरांसाठी बाइक्स वरील चित्त थरारक स्टंट सादर केले हे स्टंट बघण्यासाठी शहरातील मोठ्या प्रमाणात युवक आणि युवतींनी येथे गर्दी केली होती राहुल राठोड तसेच आकाश गणवीर यांनी हे स्टंट सादर केले।  छायाचित्र   अनिकेत भागवते

 हमालाचा मुलगा झाला न्यायाधीश 0

हमालाचा मुलगा झाला न्यायाधीश

sachin1
नाशिक : लासलगावतील हमाली करणा-या एका बापाच्या कष्टाचे चीज झाले असून मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर मात करत सचिन न्याहारकर हा हमालाचा मुलगा आता न्यायाधीश झाला आहे.
सचिन उत्तमराव न्याहारकर याने न्यायाधीश परीक्षेत ओबीसी गटातून राज्यात दुसरा येण्याचा मान पटकावला असून त्याने मिळविलेल्या या यशामुळे सचिनवर गावकरी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सचिनने दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच घेऊन बारावीपर्यंतचे शिक्षण लासलगाव येथे घेतले. बारावीत चांगले मार्क मिळाल्याने सचिनने पुण्यातील लॉ कॉलेजला प्रवेश घेतला. घरातील परिस्थिती नाजूक, आई-वडिलांनी पोटाला चिमटा काढत मुलांच्या शिक्षणात कुठलीच कसूर ठेवली नाही. नातेवाईकांच्या मदतीने पुण्यात पोहोचला आणि तेथे शिकत असतानाच त्याने न्यायाधीशाची परीक्षा दिली. या परीक्षेसाठी राज्यभरातून ४७ हजार विद्यार्थी बसले होते, त्यापैकी दोन हजार ४०० विद्यार्थी पास झाले तर ३७८ जणांना निमंत्रित करण्यात आले. अत्यंत जिद्दीने अभ्यासावर लक्ष केंद्रीत करत त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची न्यायाधीशांची परीक्षा दिली. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, सचिनने राज्यात दहावा आणि इतर मागासवर्गीय गटातून (ओबीसी) दुसरा क्रमांक मिळवला आहे.

June 06, 2015 in मुख्य पान
 एसआयटीने जारी केली कॉ. पानसरे यांच्या मारेकर्‍यांची रेखाचित्रे 0

एसआयटीने जारी केली कॉ. पानसरे यांच्या मारेकर्‍यांची रेखाचित्रे

sit
कोल्हापूर – विशेष चौकशी पथकाच्या (एसआयटी) हाती कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी दोन महत्त्वाचे सुगावे लागले असून दोन ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज एसआयटीला मिळाले आहेत. दोन मोटरसायकल आढळल्या असल्याची माहिती अप्पर पोलिस महासंचालक संजयकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एसआयटीने कॉम्रेड पानसरे यांच्या दोन्ही मारेकर्‍यांची रेखाचित्रे जारी केले आहेत. मारेकरी २० ते २५ वयोगटातील असू शकतात. तसेच ते कोणत्या मार्गाने पळाले हे स्पष्ट झाल्याचे संजय कुमार यांनी सांगितले यावेळी सांगितले. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने मारेकर्‍यांना पकडण्यात पोलिसांना यश येईल, असा दावा एसआयटीच्या अधिकार्‍यांनी केला आहे.

June 06, 2015 in मुख्य पान
 मुंबई विमानतळावर दोन कोटीचे सोने जप्त 0

मुंबई विमानतळावर दोन कोटीचे सोने जप्त

gold
मुंबई – मुंबई विमानतळावर उतरलेल्या जेट एअरवेजच्या विमानातून शनिवारी सकाळी सीमा शुल्क अधिका-यांनी दोन कोटीचे सोने जप्त केले.
९ डब्लू ५३९ या जेट एअरवेजच्या मस्कत-मुंबई विमानातील प्रसाधनगृहातून सीमा शुल्क अधिका-यांनी आठ किलो सोने जप्त केले.
सेगू नैना महम्मद शेखथीन शा या प्रवाशाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. विमानातील प्रसाधनगृहात सोने लपवल्याची कबुली त्याने दिली अशी माहिती हवाई गुप्तचर अधिका-याने दिली.
अटक केलेल्या आरोपीची न्यायालयीन कोठडी मिळवण्यासाठी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यात दुबई-मुंबई विमानातून २४.६८ लाख रुपये किंमतीची सोन्याची दोन बिस्कीटे जप्त करण्यात आली होती.
त्यानंतर दोहा-मुंबई विमानात प्रवाशाच्या आसनाखाली १.८ किलो वजनाची सोन्याची १६ बिस्कीटे सापडली होती. फ्रेबुवारी महिन्यात मस्कतला जाणा-या आंतरराष्ट्रीय विमानाच्या प्रसाधनगृहातून १.४९ कोटी रुपये किंमतीचे सहा किलो सोने जप्त करण्यात आले होते.
११ फेब्रुवारीपासून चारवेळा विमानतळाशी संबंधित कर्मचा-यांना सोने तस्करीशी संबंधित प्रकरणात अटक करण्यात आली आहे. जानेवारीपासून सीमा शुल्क विभागाने आतापर्यंत मुंबई विमानतळावरुन २५० किलो सोने जप्त केले आहे. या वर्षातील सर्वाधिक सोने जप्तीची कारवाई शनिवारी करण्यात आली.

June 06, 2015 in मुख्य पान
 ८ जूनला दहावीचा निकाल 0

८ जूनला दहावीचा निकाल

EXAM
पुणे , दि. ६ – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल येत्या ८ जून रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.
दहावीच्या निकालाच्या तारखांविषयी गेल्या आठवड्यापासून व्हॉट्सअॅपवर वेगवेगळे मेसेज फिरत होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्याची गंभीर दखल घेऊन, शनिवारी दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्याचं बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसारच, येत्या ८ जूनला दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर होईल, अशी घोषणा बोर्डानं केली आहे. मुंबई, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, नाशिक, कोल्हापूर या नऊ विभागीय मंडळांतर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेला यंदा राज्यभरातून १७ लाख ३२ हजार ८९८ विद्यार्थी बसले होते. त्याच्या करिअरची दिशा परवाच्या निकालातून ठरणार आहे. यंदाच्या बारावीच्या निकालाची विक्रमी टक्केवारी पाहता, दहावीचा निकालही नवा विक्रम रचतो का, याबद्दल उत्सुकता आहे.

 

June 06, 2015 in मुख्य पान
पोलीस व महसूल अधिकाºयासमोरच शेतकºयाने घेतले विष 0

पोलीस व महसूल अधिकाºयासमोरच शेतकºयाने घेतले विष

060620153877
मृतदेहासह नातेवाईकांचा जिल्हाकचेरीसमोर ठिय्या
यवतमाळ, दि. ६ – पोलीस व महसूल अधिकाºयासमक्ष तालुक्यातील लोणी (घाटाणा) येथील शेतकºयाने विषाचा घोट घेतल्याची घटना आज शनिवारी घडली. या घटनेने संतप्त झालेले शेतकरी, नातेवाईकांनी मृतदेहासह जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला.
बाबूलाल हरलाल राठोड (६०) असे मृतक शेतकºयाचे नाव आहे. मधुकर येरावार यांनी अजय येरावार याच्या नावे असलेली दोन हेक्टर दोन आर जमिन बाबुलाल राठोडला विक्री केली. दरम्यान सिलींगच्या कायद्यानंतर शासनजमा झालेली जमिन भूमिहीन लाभार्थ्यांना देण्याचा शासन निर्णय १९९१ मध्ये झाला. लोणी (वाटाणा) येथील २३ लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे देण्यात आले. मात्र जमिनी ताब्यात न मिळाल्याने या लाभार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सदर शेतकºयाच्या बाजूने निकाल देत जमिनीचे त्याला मालक ठरविले. तर दुसरीकडे लाभार्थ्यांना जमिन ताब्यात देण्याचे आदेश दिले. दरम्यान ५ मे रोजी शुक्रवारी जमिन अधिग्रहण करण्यासाठी मंडळ अधिकारी, तलाठी, ठाणेदार वडगाव (जंगल) घटनास्थळी पोहोचले. यावेळी ठाणेदारांनी शेतकºयाला मारहाण करून अपमानस्पद वागणूक दिली. हा मानसिक धक्का बसलेल्या शेतकºयाने अधिकाºयांच्या समक्षच विष घेतले. यावेळी अधिकाºयांनी पोलीस वाहनात शेतकºयाला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र आज शनिवारी ६ जून रोजी पहाटे या शेतकºयाचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेले शेतकरी-नातेवाईकांनी मृतदेहासह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

June 06, 2015 in मुख्य पान
लाचखोर विस्तार अधिकारी, शिक्षक एसीबीच्या जाळ््यात 0

लाचखोर विस्तार अधिकारी, शिक्षक एसीबीच्या जाळ््यात

IMG-20150606-WA0058
यवतमाळ, दि. ६ – प्राथमिक शाळेला खाते मान्यता मंजूर करून देण्यासाठी २३ हजाराची लाच शिक्षकामार्फत स्वीकारणाºया विस्तार अधिकाºयास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज दुपारी २ वाजता दरम्यान पंचायत समितीच्या परिसरात करण्यात आली.
सुरेश गुलाब निकम (५६) असे लाचखोर विस्तार अधिकारी व राजू ओमकार गोरे असे शिक्षकाचे नाव आहे. सुरेश निकम विस्तार अधिकारी म्हणून जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत आहे. पुसद तालुक्यातील बान्सी येथील मनोहरराव नाईक प्राथमिक मराठी शाळेला खाते मान्यता पाहीजे होती. त्यासाठी विस्तार अधिकाºयाने पैशाची मागणी केली होती. अखेर कर्मचाºयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडे तक्रार केली. त्यावरून गोदणी मार्गावर असलेल्या पंचायत समितीच्या परिसरात आज दुपार दरम्यान सापळा रचण्यात आला. २३ हजाराची रक्कम राजू ओमकार गोरे या शिक्षकाने स्वीकारली. त्यावरून सुरेश निकमसह शिक्षकाला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, अरुण गिरी, प्रकाश शेंडे, नरेंद्र इंगोले, सुधाकर मेश्राम, शैलेश ढोणे, अमोल महल्ले, अमित जोशी, नीलेश पखाले, गजानन राठोड, अनिल राजकुमार, किरण खेडकर, विशाल धलवार, कोकेवार आदींनी केली.

June 06, 2015 in विदर्भ
इंडीका अपघातात १ ठार, तीन जखमी 0

इंडीका अपघातात १ ठार, तीन जखमी

1
आर्णी , दि. ६ – माहुर येथून दर्शन घेऊन गावाकडे परत जाताना इंडीका झाडावर आदळली. यामध्ये एक युवती जागीच ठार असून तीन जण जखमी झाले. दहिसावळी येथे आज शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता ही घटना घडली.
आरती बाबुसिंग जाधव (१९) असे मृतक युवतीचे नाव आहे. तर अतीष संजय जाधव (२२), टिना रमेश राठोड (२०), आकाश बाबुसिंग जाधव (२५) रा. घाटकिन्ही ता. दारव्हा अशी जखमींची नावे आहे. एम.एच. २९ / १७८६ क्रमांकाच्या इंडीकाने ते माहुर येथे रेणुकामातेच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन ते लोणबेहळ येथे परत आले. त्यावेळी गाडीतील एकाचा मोबाईल माहुर येथे हॉटेलमध्ये विसरल्याचे लक्षात आले. त्यामुळे तेथून पुन्हा माहुर येथे गेले. तेथून परत येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने इंडीका दहिसावळी जवळ झाडावर आदळली. यामध्ये आरती, अतीष, टिना, आकाश हे जखमी झाले. तर आरतीचा रुग्णालयात मृत्यू झाला. जखमीवर यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. महामार्ग पोलीस अजय डोळे, चालक दिपक चातारकर यांच्यासह बाबाराव गावंडे, निलेश आचमवार यांनी जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी मदत केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

June 06, 2015 in विदर्भ
कासवांची तस्करी करणा-यांना अटक 0

कासवांची तस्करी करणा-यांना अटक

download
नागपूर : न्यू दिल्ली -पाँडीचेरी एस्क्प्रेसमधून नागपूर मार्गे कासवांची तस्करी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याविषयी गुप्त माहिती रेल्वे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार त्यांनी ही गाडी स्टेशनवर येताच पोलिसांनी तपासणी सुरु केली. त्यांना एस ९ क्रमांकाच्या डब्यातील बर्थ क्रमांक १५ खाली ठेवलेली बॅग संशयास्पद वाटली. पोलिसांनी तपासणी केली असता त्यात शंभर कासव आढळले. काही कासव मृतावस्थेत होते. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. शिवकुमार सिद्दरांगु (२१) आणि ब्रभातबिहारी चंद्राबाबू (२७) अशी आरोपींची नावे आहेत. कासव वनविभागाकडे सुपूर्त करण्यात आले आहेत.

June 02, 2015 in मुख्य पान
इंडिया टीमचे हंगामी प्रशिक्षक रवी शास्त्री 0

इंडिया टीमचे हंगामी प्रशिक्षक रवी शास्त्री

ravi-shastri
नवी दिल्ली, दि. २ – आगामी बांग्लादेश दौ-यासाठी माजी खेळाडू रवी शास्त्री यांची भारतीय क्रिकेट संघाचे हंगामी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी हा निर्णय जाहीर केला. गेल्या वर्षी झालेला ऑस्ट्रेलिया दौरा व त्यानंतर पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान शास्त्री यांनी भारतीय संघासाठी ‘टीम डायरेक्टर’ म्हणून काम पाहिले होते. दरम्यान संजय बांगर यांची बॅटिंग कोच म्हणून, बी अरूण यांची बॉलिंग कोच म्हणून आणि आर. श्रीधर यांची फिल्डिंग कोच म्हणून नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. येत्या १० जूनपासून भारतीय संघ बांग्लादेशच्या दौ-यावर जाणार असून तेथे एक कसोटी व तीन एकदिवसीय सामने खेळण्यात येणार आहेत.

June 02, 2015 in क्रीडा
चीनमध्ये जहाज बुडाले, ४०० जण बेपत्ता 0

चीनमध्ये जहाज बुडाले, ४०० जण बेपत्ता

Eastern-Star
बीजिंग- दक्षिण चीनमधील हुबेई प्रांतातील यांगजी नदीत सोमवारी रात्री पर्यटकांना घेऊन जाणारे ‘इस्टर्न स्टार’ जहाज वादळामुळे बुडाले. जहाजावर ४५८ प्रवासी असून आत्तापर्यंत १० जणांची सुटका करण्यात यश आले आहे. बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यात येत आहे.
चीनमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वेकडील नानजिंग शहरापासून चाँगकिंग शहराकडे हे जहाज जात होते. या जहाजातून ४५८ प्रवासी प्रवास करत होते.
वादळामुळे जहाज बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर बचावकार्य तत्काळ राबविण्यात आले. मात्र सोसाट्याचे वारे आणि पाऊस अशा खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.
यातील काही पर्यटक पोहत किना-यावर आले, तर काही जणांना मच्छिमारांनी वाचविले आहे. मात्र अद्यापही ४०० जण बेपत्ता असल्याचे समजते.

June 02, 2015 in मुख्य पान
सुतगिरणीला आग , कोट्यावधीचे नुकसान 0

सुतगिरणीला आग , कोट्यावधीचे नुकसान

01.YTPH-08
यवतमाळ, दि. १- शहरालगत लोहारा एमआयडीसीतील प्रियदर्शनी सहकारी सुतगिरणीला आग लागुन ७०० रुईच्या गाठी खाक झाल्या. रविवारी रात्री ही घटना घडली असून यामध्ये कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले आहे.
सुतगिरणीत कामगार रिसायलींगचे काम करीत होते. दरम्यान गारगोटीमध्ये संघर्ष होऊन ठिणगी ब्लो रुममध्ये उडाल्याने रुममध्ये असलेल्या रुईच्या गाठीनीने पेट घेतला. पाहता-पाहता आगीने रौद्ररुप धारण करून तेथील रुई गठाणी कवेत घेतले.ही बाब लक्षात येताच घटनास्थळी अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. सहा बंब पाण्याचा मारा केल्यानंतर आज सोमवारी पहाटे ही आग आटोक्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार अनूप खांडे, मुख्याधिकारी अतूल पंत यांचेसह पोलीस अधिकाºयोनी घटनास्थळाला भेट दिली. या आगीत ७०० रुईच्या गाठी जळून खाक झाल्या असून कोट्यावधीचे नुकसान झाले.

June 01, 2015 in मुख्य पान
अल्पसंख्याकांच्या विरोधातील विधाने खपवून घेणार नाही - नरेंद्र मोदी 0

अल्पसंख्याकांच्या विरोधातील विधाने खपवून घेणार नाही – नरेंद्र मोदी

narendra-modi-5249148c4f102_exl
भारतीय घटना प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य देते. त्यामुळे अल्पसंख्याकांच्या विरोधात टिप्पणी करण्याची काहीही गरज नसल्याची तंबी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अल्पसंख्याकांविरोधात गरळ ओकणाऱयांना दिली आहे. मोदींच्या टीकेचा रोष यावेळी अप्रत्यक्षरित्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिशेने होता. मोदींच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये देशातील प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्य असून, अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य करता कामा नये, असा स्पष्ट संदेश मोदींनी देऊ केला. अल्पसंख्याक समाजाविरोधातील विधाने, भेदभाव किंवा हिंसा यापुढे खपवून घेतली जाणार नसल्याचे मोदींनी यावेळी कडक शब्दांत सांगितले. यासोबतच देशातील नागरिकांना अच्छे दिन आल्याचा दावाही मोदींनी यावेळी केला. देशाला अच्छे दिन आले आहेत मात्र काही जण आमच्या कामातील केवळ उणीवा शोधून काढण्यात वेळ घालवत असल्याची टीका मोदींनी यावेळी केली.

 

June 01, 2015 in मुख्य पान
बोगस रासायनिक खत विक्रेत्यांविरूध्द पोलीसात गुन्हे दाखल 0

बोगस रासायनिक खत विक्रेत्यांविरूध्द पोलीसात गुन्हे दाखल

2014-05-24-24am-badnera_ns
यवतमाळ – विभागात भरारी पथकाद्वारे अमरावती व अकोला जिल्ह्यातील दोन बोगस रासायनिक खत विक्रेत्याविरूध्द कारवाही करून त्यांच्यावर पोलीसात गन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती विभागीय
कृषी सहसंचालक कार्यालयाव्दारे देण्यात आली. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी विभाग, जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. दोन- तीन दिवसापुर्वी भरारी पथकाने अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील राजू वानखडे यांच्याकडे धाड टाकूण अंदाजे तीन लक्ष अठ्यात्तर रूपये किंमतीचा 17.38 मेट्रीक टन साठा जप्त केला. त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यात मुर्तीजापूर येथील सुजीत प्रल्हाद धुत याचेकडुन 1.5 क्वींटल बोगस रासायनिक खत, व सोबत दस्तऐवज असलेले चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. या मुद्देमालाची किंमत अंदाज चार लक्ष चौपन्न हजार इतकी आहे. या दोनही बोगस रासायनिक खत विक्रेत्याविरुध्द कृषी विभागाने पोलीसात गुन्हा दाखत केला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.विभागामध्ये भरारी पथकाने 5498वितरक/विक्रेते पैकी 1012 विक्रेत्याकडे रासायनिक खत तपासनी
केली. यामध्ये अमरावती जिल्ह्यात उणिवा, त्रुटी आढळलेल्या दोन दुकांनदारांना विक्रीबंद करण्याचे आदेश देण्यात आले. बियाणे विक्री संदर्भातही भरारी पथकाने 1035 बियाणे विक्रेत्यांच्या दुकानाची तपासनी केली या
तपासणी मध्ये बुलडाणा जिल्ह्यात 60, अकोला जिल्ह्यात 7, वाशिम जिल्ह्यात 2, अमरावती जिल्ह्यात 6 तर
यवतमाळ जिल्ह्यात 47 बियाणे विक्रेत्यांकडे उणिवा व त्रृटी आढळल्यामुळे 122 विक्रेत्यांना बियाणे विक्रीबंद
ठेवण्याचे आदेश दिले असून अमरावती जिल्ह्यातील दोन बियाणे विक्री परवाने निलंबीत करण्यात आले आहेत.
किटकनाशकासंबंधी विभागात 4636 वितरक/विक्रेत्यांपैकी 305 दुकानाची तपसणी करण्यात आली. या तपासणीत अमरावती जिल्ह्यातील दोन दुकानात उणिव, त्रृटी आढळल्यामुळे त्यानाही विक्रीबंधीचे आदेश दिले
आहेत. तसेच अमरावती जिल्ह्यात बोगस किटक नाशकासंबंधी एका प्रकरणात 127 लिटर किटक नाशकाचा
साठा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजी किंमत 0.66 लक्ष रुपये इतकी असल्याचे कृषी विभागाने
कळविले आहे.