पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February, 2016

गंगाजल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राष्ट्रगीताचा 0

गंगाजल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राष्ट्रगीताचा

 

2016-02-24-1-priyanka_nsराष्ट्रगीत म्हटलं की सर्वसामान्यांचं देशप्रेम उफाळून येतं, याचाच फायदा घेत प्रकाश झा यांनी गंगाजलच्या प्रमोशनसाठी राष्ट्रगीताचा वापर केला आहे. पोलीस दलातील महिलांना मानवंदना असं सांगत प्रियांका चोप्रा, स्वत: प्रकाश झा आणि पोलीसांच्या वेशातील अन्य जन गण मन गातात, असं या राष्ट्रगीताचे स्वरुप आहे.

राष्ट्रगीताचा आदर राखणे आणि ते सुरू असताना प्रत्येकानं उठून उभे राहणे हे आवश्यकच आहे. परंतु राष्ट्रगीताचा वापर गंगाजल या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी, प्रमोशनसाठी करावा का हा प्रश्न आहे. कारण, हे राष्ट्रगीत संपल्यानंतर जय गंगाजल अशी चित्रपटाची जाहिरातही याच व्हिडीयोमध्ये येते.

राष्ट्रगीत हा इतका संवेदनशील विषय आहे की, जे मान देत नाहीत, त्यांना देशद्रोही ठरवण्यास खूपजण मोकळे होतात, परंतु राष्ट्रगीताचा असा व्यावसायिक कारणासाठी वापर करणं योग्य ठरतं का प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

February 26, 2016 in मनोरंजन
गंगाजल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राष्ट्रगीताचा वापर योग्य वाटतो का 0

गंगाजल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राष्ट्रगीताचा वापर योग्य वाटतो का

2016-02-24-1-priyanka_ns

राष्ट्रगीत म्हटलं की सर्वसामान्यांचं देशप्रेम उफाळून येतं, याचाच फायदा घेत प्रकाश झा यांनी गंगाजलच्या प्रमोशनसाठी राष्ट्रगीताचा वापर केला आहे. पोलीस दलातील महिलांना मानवंदना असं सांगत प्रियांका चोप्रा, स्वत: प्रकाश झा आणि पोलीसांच्या वेशातील अन्य जन गण मन गातात, असं या राष्ट्रगीताचे स्वरुप आहे.

राष्ट्रगीताचा आदर राखणे आणि ते सुरू असताना प्रत्येकानं उठून उभे राहणे हे आवश्यकच आहे. परंतु राष्ट्रगीताचा वापर गंगाजल या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी, प्रमोशनसाठी करावा का हा प्रश्न आहे. कारण, हे राष्ट्रगीत संपल्यानंतर जय गंगाजल अशी चित्रपटाची जाहिरातही याच व्हिडीयोमध्ये येते.

राष्ट्रगीत हा इतका संवेदनशील विषय आहे की, जे मान देत नाहीत, त्यांना देशद्रोही ठरवण्यास खूपजण मोकळे होतात, परंतु राष्ट्रगीताचा असा व्यावसायिक कारणासाठी वापर करणं योग्य ठरतं का प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

हा व्हिडीयो प्रियांका चोप्राने 26 जानेवारी रोजी शेअर केला होता. हाच व्हिडीयो अनेक मल्टिप्लेक्समध्ये दाखवण्यात येत आहे. त्यात एक शक्यता आहे की हे गंगाजलची जाहिरात करणारे राष्ट्रगीत दाखवण्यासाठी मल्टिप्लेक्सही चांगलीच किंमत वसूल करत असणार.

गंगाजलमध्ये पोलीस सुपरिटेंडेंटच्या भूमिकेत प्रियांका चोप्रा झळकत असून प्रकाश झांचं दिग्दर्शन आहे. हा विषय अत्यंत चांगला आहे यात काही वाद नाही, परंतु हा व्हिडीयो प्रकाश झा प्रॉडक्शनने देशभक्ती दाखवण्यासाठी चित्रपटगृहात दाखवलाय की चित्रपटाची जाहिरात करण्यासाठी हा प्रश्न शिल्लक राहतोच.

 

February 26, 2016 in मनोरंजन
मुंबईची पहिल्या दिवशी सौराष्ट्रावर आघाडी 0

मुंबईची पहिल्या दिवशी सौराष्ट्रावर आघाडी

2016-02-24-Untitled-1_ns

पुणे, दि. २४ –  रणजी स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मुंबईने रणजी सामन्यात्या पहिल्याच दिवशी सौराष्ट्रावर आघाडी मिळवत ४१ व्या रणची चषकावर नाव कोरण्याची तयारी केली आहे.

मुंबईने नानेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले. कर्णधाराचा हा निर्णय गोलंदाजानी अचूक ठरलवा.

पहिल्याच दिवशी मुंबईच्या गोलंदाजानी सौराष्ट्रावर मात केली. शेवटचे वृत हाती आले तेंव्हा ५८ षटकात ७ गड्याच्या मोबदल्यात १२६ धावा करण्यात सौराष्ट्राला यश आले होते. सौराष्ट्राकडून  अर्पित वासवदा ५९ आणि कर्णधार जयदेव शहा १३ धावावर खेळत आहेत. अवि बारोत १४,  अनुभवी चेतेश्वर पुजारा ४, चिराग जानी १३ वाधांचे योगदान दिले आहे. मुंबईकडून कुलकर्णी ने ३ ठाकूरने २ नायर आणि साधूने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.

 

दोन्ही संघात विजेतेपदासाठी पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर लढत सुरु  आहे. हा ‘रन’संग्राम कोण जिंकेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईचा संघ ४५ व्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. मुंबईने ४० वेळा रणजी चषक पटकावला आहे. सौराष्ट्राचा संघ दुसऱ्यांचा अंतिम फेरीत स्थान मिळविण्यात यशस्वी ठरला आहे.

हे दोन्ही संघ २०१२-१३ मध्ये अंतिम फेरीत समोरासमोर आले होते. त्यात मुंबईने सौराष्ट्रला एक डाव व १२५ धावांनी पराभूत करीत ४० वा किताब नावावर केला होता.

 

रणजीच्या ८२ वर्षांच्या इतिहासात मुंबईने ४० वेळा किताब नावावर केला आहे. चार वेळा ते उपविजेते राहिले आहेत. मुंबई १९९१ नंतर खेळलेल्या दहा अंतिम सामन्यांत एकदाही हरलेली नाही. मुंबईची मदार ही फलंदाजांवर असेल. श्रेयस

प्रतिस्पर्धी संघ –

मुंबई : आदित्य तारे (कर्णधार-यष्टीरक्षक), सुर्यकुमार यादव, अभिषेक नायर, अखिल हेरवाडकर, श्रेयस अय्यर, निखिल पाटील, शार्दुल ठाकुर, सिद्धेश लाड, धवल कुलकर्णी, विशाल दाभोलकर, इक्बाल अब्दुल्ला, बद्रे आलम, भाविन ठक्कर, सुफियान शेख, बलविंदर सिंग संधु.

सौराष्ट्र : जयदेव शहा (कर्णधार), शेल्डन जॅक्सन, अवि बारोत, चेतेश्वर पुजारा, चिराग जानी, जयदेव उनादकट, प्रेरक मनजाद, कमलेश मकवाना, धर्मेंद्रसिंह जडेजा, वंदित जीवराजानी, अर्पित वासवदा, दिपक पुनिया, हार्दिक राठोड, मोहसिन दोडिया, सागर जोगियानी (यष्टीरक्षक).

 

February 26, 2016 in क्रीडा

बंजारा साहित्य व संस्कृतीचे जतन व्हावे-

d110543-large

February 08, 2016 in रोजगार

अंधेरीत हॉटेलमध्ये चकमकीत हरयाणातील कुख्यात गुंड ठार

2016-02-07-murder_ns

मुंबई, दि. ७ – अंधेरी येथील विमानतळ परिसरातील एका हॉटेलमध्ये रविवारी सकाळी चकमक झाली. या चकमकीत गुडगावमधील कुख्यात गुंड संदीप गडोली ठार झाला. अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये हव्या असलेल्या संदीपवर हरयाणा पोलिसांनी सव्वालाखाचे इनाम ठेवले होते.
संदीपच्या शोधात हरयाणा पोलिस मुंबईत दाखल झाले. संदीप गडोली अंधेरीतील विमानतळ परिसरातील एका हॉटेलमध्ये लपला असल्याची माहिती मिळाली होती. मुंबई पोलिसांसह हरयाणा पोलिस संदीप रहात असलेल्या हॉटेलमध्ये दाखल झाले. पोलिस संदीपच्या रुमजवळ पोहोचताच त्याने गोळीबार सुरु केला.
प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात संदीप गंभीर जखमी झाला. जखमी संदीपला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. संदीपने केलेल्या गोळीबारात दोन पोलिस जखमी झाले. सकाळी साडेअकराच्या सुमारासा अंधेरी पूर्वेला विमानतळ परिसरातील एका हॉटेलमध्ये ही चकमक झाली.
February 08, 2016 in रोजगार

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा, त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला किती प्रोत्साहन मिळाले हे महत्त्वाचे असते. जागतिक बँकेचा एक अहवाल आहे. एक कोटी रुपयांचे काम होते, तेव्हा ८०० लोकांना रोजगार मिळतो, असे या अहवालाने म्हटले आहे. म्हणून आज पायाभूत सुविधांची उभारणी करणाऱ्या प्रकल्पांतच रोजगारनिर्मितीची क्षमता खूप मोठी आहे. आजच्या देशाच्या आíथक स्थितीत, जास्तीत जास्त रोजगारनिर्मिती ही आपली पहिली गरज आहे. आपल्या देशात पायाभूत सुविधांच्या उभारणीत वित्तपुरवठा ही अजिबातच समस्या नाही. परंतु १२ टक्के व्याजाने पसा उभारून ही कामे करणे आता अवघड आहे. त्यासाठी व्याज कमी केले पाहिजे. मी आत्तापर्यंत दीड लाख कोटी रुपयांची कामं प्रत्यक्षात केलेली आहेत आणि आमच्या सरकारला दोन वष्रे पूर्ण होतील, तेव्हा दोन लाख कोटींची कामे पूर्ण झालेली असतील असा मला विश्वास आहे. पाच वर्षांत पाच लाख कोटींची कामे आपण पूर्ण करू असे मला अगोदर वाटले होते. पण आता मात्र मला असे वाटते आहे, की पाच वर्षांत सात लाख कोटींची रस्ते विकासाची कामे आपण करू शकू. मात्र यामध्ये एक महत्त्वाचा अडचणीचा मुद्दाही आहे. जेव्हा मी या खात्याचा मंत्री झालो, तेव्हा या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न मी सुरू केला. माझ्या खात्यातील तीन लाख ऐंशी हजार कोटींचे ३८४ प्रकल्प बंद पडलेले होते. त्यातले ४१ प्रकल्प आम्ही रद्द केले. आठ दिवसांपूर्वी मी सर्व बॅँकांच्या अध्यक्षांची बठक घेतली होती. आज त्यापकी २५ हजार कोटींचे फक्त १७ प्रकल्प बाकी आहेत.. जवळपास तीन लाख ६० कोटींचे प्रश्न जवळपास सुटले आहेत. हे प्रकल्प तीन कारणांमुळे बंद पडले होते. पहिले कारण म्हणजे, प्रकल्पासाठी लागणाऱ्या परवानग्यांसाठी छळणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. जमीन संपादन ही पहिली समस्या. त्यामुळे भूसंपादनासाठी राज्य सरकारांचा सहयोग असला पाहिजे. शेतकरी सहकार्य करत नाहीत असा हल्ली समज असला, तरी तो खरा नाही. कारण आता असा एक निर्णय झाला आहे, की या कामासाठी शहरी भागात जर जमीन घेणार असू तर कलेक्टर जी किंमत करेल त्याच्या दुप्पट, तर ग्रामीण भागात एकास चार या प्रमाणात मोबदला दिला जावा. लोकांची मानसिकता बदलतेय. प्रकल्पासाठी जमीन देण्याची तयारी होत आहे.. पण यंत्रणांच्या समस्या आहेत. मी महाराष्ट्रात मंत्री असताना रेल्वे खात्याने मला पूर्वी खूप त्रास दिला आहे. त्यामुळे मी त्याचे उट्टे काढणारच होतो.. मुंबईत ५५ उड्डाण पुलांचे काम मी सुरू केले, पण त्याआधी रेल्वेने माहीमच्या उड्डाण पुलाचे विस्तारीकरणाचे काम हाती घेतले होते. माझे ५५ उड्डाण पूल पूर्ण झाले, तरी माहीम पुलाच्या विस्ताराचे काम पूर्ण झाले नव्हते. नंतर अनेक वर्षांनी ते काम पूर्ण झाले. रेल्वेत ओव्हरब्रीजच्या कामाच्या मंजुऱ्यांसाठी एक फाईल १७ टेबलांवर फिरते. त्यामुळे ते काम रखडले. पण आता ऑनलाइन सिस्टीममुळे ते काम जलद होऊ लागले आहे. बॅंकांनीही सहकार्य केल्याने आज रस्ते विकास क्षेत्रात कुठलीही अडचण राहिलेली नाही. आता आम्ही या अनुभवातून एक नवे मॉडेल तयार केले आहे. ते आहे, हायब्रीड मॉडेल.. यामध्ये आधी ऐंशी टक्के भूसंपादन झाल्याखेरीज आता काम सुरू करण्याचे आदेशच दिले जात नाहीत. पर्यावरणविषयक मंजुऱ्या, रेल्वे पुलांच्या मंजुऱ्या, युटिलिटी शिफ्टची कामे आम्हीच करतो आणि नंतरच टेंडर काढतो. यामुळे या प्रकल्पाच्या किमतीच्या ४० टक्के अनुदान स्वरूपात आम्ही देऊ, ६० टक्के त्याने उभे करावेत. हे हायब्रीड मॉडेल कमालीचे यशस्वी ठरतेय. येत्या मार्चच्या आत जवळपास ४० हजार कोटींचे प्रकल्प या मॉडेलच्या माध्यमातून अंतिम टप्प्यात येतील. कारण अडचणी दूर झाल्यात. वित्त उभारणीतील नव्या कल्पना राबविण्याची गरज आहे. माझ्या खात्याचे बजेट ४५ हजार कोटींचे आहे. या वर्षी १५-२० हजार कोटींनी वाढेल. आणि त्याबरोबरच, टोलचे सुमारे दहा हजार कोटींचे वार्षकि उत्पन्न मी जर १५ वर्षांकरिता सिक्यरिटाईज केलं, तर मला दीड लाख कोटी रुपये मिळतील. ७० हजार कोटींचे करमुक्त बॉण्ड काढायची परवाननगी मिळाली होती, पण ते काढायची गरजच पडली नाही, त्यामुळे ते ७० हजार कोटी शिल्लक आहेत. आणि सरकारी खर्चाने पूर्ण केलेले १०१ प्रकल्प सिक्युरिटाईज केले, तर एक लाख ४० हजार कोटी मिळतील, शिवाय जगातून अनेकजण कमी व्याजात पसे देण्यास तयार आहेत. त्यामुळे पसा उभा करण्यात कोणतीच अडचण राहिलेली नाही. आमच्या प्रमुख प्रकल्पांची उलाढालच चार हजार कोटी डॉलरहून अधिक आहे. दर वर्षी उलाढाल वाढतेच आहे. त्यामुळे डॉलरमध्ये कर्ज मिळण्यात काहीच अडचण राहिलेली नाही. त्यामुळे, देशांतर्गत जलवाहतुकीसाठी ५० हजार कोटी मी दोन टक्क्यांहून कमी व्याजाने डॉलरमधून उभे करण्याचे मी ठरवले आहे. यंदाचे वर्ष तर, इतिहासातील असे वर्ष आहे, की आमचे सर्व उपक्रमांचा फायदा सहा हजार कोटींहून अधिक आहे. हे सारे पसे अंतर्गत जलवाहतुकीत गुंतविण्याचा आमचा विचार आहे.

नितीन गडकरी,

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री nitin-gadkari1-670x447

February 08, 2016 in रोजगार

..तरीही महिलांना प्रवेश मिळणार नाही

शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी अनिता शेटे या महिलेची निवड करून आपण खूप पुरोगामी होत आहोत, असे दाखविण्याचा प्रयत्न देवस्थानने केला असला तरी तो केवळ देखावाच ठरणार आहे.

सोनई – शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी अनिता शेटे या महिलेची निवड करून आपण खूप पुरोगामी होत आहोत, असे दाखविण्याचा प्रयत्न देवस्थानने केला असला तरी तो केवळ देखावाच ठरणार आहे. कारण संस्थानच्या अध्यक्षपदी महिलेची निवड झाली तरीही शनिदेवाच्या चौथ-यावर महिलांना प्रवेश मिळणार नाही, असे नवनिर्वाचित अध्यक्षा अनिता शेटे यांनी ‘प्रहार’शी बोलताना सांगितले.

एका महिलेने महिन्यांपूर्वी चौथ-यावर प्रवेश करून शनिदेवाला तेलाचा अभिषेक केल्यानंतर मोठा गदारोळ

February 03, 2016 in महाराष्ट्र

बंजारा साहित्य व संस्कृतीचे जतन व्हावे-

d110543-large

February 02, 2016 in रोजगार
व्हील चेअर न देता एअर इंडियाने अपंग महिलेला विमानातून खेचून बाहेर काढले 0

व्हील चेअर न देता एअर इंडियाने अपंग महिलेला विमानातून खेचून बाहेर काढले

2016-01-31~airindia_ns

नवी दिल्ली, दि. ३१ – एअर इंडियाच्या अधिका-यांनी आपल्याशी गैरवर्तन करत फ्लाईटमधून खेचून बाहेर काढल्याचा आरोप एका अपंग महिलेने लावला आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीत असोसिएट प्रोफेसर असणा-या अनित घई यांच्या सांगण्यानुसार, एअर इंडियाने त्यांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था तर केली नाहीच आणि त्याबद्दल विचारणा केली असता अधिका-यांनी त्यांना विमानाच्या बाहेर काढले. मात्र एअर इंडियाच्या अधिका-यांनी हे आरोप फेटाळून लावत घई यांना व्हील चेअर देण्यात आली होती, असा दावा केला आहे.