यवतमाळ स्पेशल

गहाण मालमत्तेची विक्री
यवतमाळ : बँकेत गहाण ठेवलेला प्लॉट व मालमत्तेची परस्पर विक्री करून सात लाखाने वाशीम अर्बन बँकेच्या आर्णी शाखेची फसवणूक केली. याप्रकरणी व्यवस्थापकाने दिलेल्या दोन तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी सहा जणांविरुद्घ गुन्हे दाखल केले.
विजय देविदास कोळपावार (३९) रा. गांधीनगर आर्णी याने २१ जानेवारी पूर्वी वाशीम अर्बन बँक आॅफ वाशीम शाखा आर्णी येथून दोन लाख रुपये कर्ज घेतले होते. त्याकरिता तारण म्हणून बँकेला स्थावर मालमत्ता लिहून दिली होती. अशातच कोळपावार याने बँकेची २ लाख ३३ हजार ८४६ रुपये न भरता परस्पर मालमत्तेची विक्री करून बँकेची फसवणूक केली. तसेच आशीष कृष्णराव जाधव (३३) रा. गिलाणीनगर यवतमाळ याने सदर बँकेतून प्लॉट गहाण ठेवून पाच लाख रुपये कर्ज घेतले. त्यानंतर प्लॉट विकून बँकेचे पैसे न भरता फसवणूक केली. हे दोन्ही प्रकार नुकतेच उघडकीस आले. याप्रकरणी श्रीराम नंदलाल करवा यांच्या तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम ४०६, ४२०, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


6 + = fourteen