राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालयाची

प्रवेश परीक्षा जून मध्ये
यवतमाळ – राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय डेहराडून (उत्तरांचल) येथे प्रवेश घेवू इच्छिणाºया महाराष्ट्रातील मुलांसाठी १ व २ जून रोजी पुणे येथ प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. या परिक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी ३१ मार्च पर्यंत विहित नमुना अर्ज परिपूर्ण भरुन आवश्यक कागदपत्रासह सादर करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे येथील आयुक्त शिवाजी पांढरे यांनी केले.
या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांचे वय १ जानेवारी २०१५ रोजी सोड अकरा वर्षापेक्षा कमी व १३ वर्षापेक्षा अधिक नसावे म्हणजेच त्या विद्यार्थ्यांचा जन्म २ जानेवारी २००२ ते १ जुलै २००३ या कालावधीतील असावा. तसेच तो विद्यार्थी १ जानेवारी २०१५ रोजी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता ७ वी त शिकत असावा किंवा ७ वी पास असावा.
सदर परीक्षेसाठी आवेदन पत्र विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्यात‍ येत आहे. अनुसूचित जाती/जमातीसाठी ४०५ रुपयाचा तर सवर्साधारण संवर्गातील विद्यार्थ्यांनी ४५० रुपयाचा स्टेट बँक आॅफ इंडिया या बँकेचाच ड्राफ्ट कमांडंट, आर.आय.एम.सी.डेहराडून यांचे नांवे काढून ड्राफ्टवर पेअबलट डेहराडून (तेलभवन बँक कोड नं ०१५७६) अशी नोंद करावी. अनुसूचित जाती/जमातीच्या विद्यार्थ्यांनी जातीच्या दाखल्याच्या प्रती सोबत सादर करणे आवश्यक आहे. ड्राफ्ट मिळाल्यानंतर आवेदन पत्र, माहितीपत्र व पाच वर्षाच्या प्रश्न पत्रिकांचा संच, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेकडून स्पीड पोस्टने पाठविण्यात येईल. किंवा विद्यार्थी राष्ट्रीय इंडियन मिलीटरी कॉलेज डेहराडून, उत्तरांचल २४८००३ यांचेकडून सुध्दा आवेदन पत्र प्राप्त करुन घेऊ शकतात.
विद्यार्थ्यानी वर नमुद केल्याप्रमाणे डिमांड ड्राफ्ट काढून आवेदन पत्र मागवावे व परिपूर्ण भरलेले आवेदन पत्र ३१मार्च पर्यंत आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद १७ डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे ४११००१ या पत्यावर पाठवावित. मुदतीनंतर प्राप्त होणारी आवेदनपत्र स्वीकारण्यात येणार नाही. आवेदन पत्रासोबत जन्मतारखेचा दाखलची (अनुसूचित जाती/जमातीसाठी) जातीच्या दाखल्याची छांयाकित प्रत व्दिप्रतीत तसेच बोनाफाईड सर्टीफिकेट सादर करणे आवश्यक आहे.
परिक्षेसाठी इंग्रजी, गणित आणि सामान्य ज्ञान या तीन विषयाचे लेखी पेपर आहेत. परिक्षर्थींना गणित व सामान्य ज्ञानाचा पेपर इंग्रजी अथवा हिंदीमध्ये लिहिता येईल. या विषयाच्या प्रश्नपत्रिका इंग्रजी व हिंदीमध्ये उपलब्ध होतील. लेखी परिक्षेत उत्तिर्ण होणºयां विद्यार्थ्यांच्या मुलाखती ९ आॅक्टोंबर रोजी घेण्यात येतील.

One Response to राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालयाची

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


eight − = 5