यवतमाळ : वनपरिक्षेत्रातर्गत येणाºया लासीना येथील एका शेतात बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आज सायंकाळी ७ वाजता ही घटना उघडकीस आली असून या बिबट्याचा मृत्यू कशाने झाला हे कळू शकले नाही. लासिना शिवारात विजय नितनवरे यांचे शेत आहे. नोकर वासुदेव राठोड हा आज बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास शेतात गेला होता. यावेळी त्याला टेकळी जवळ मृत बिबट्या आढळून आला. या घटनेची वार्ता गावात पसरताच बघ्यांनी शेतात तोबा गर्दी केली होती. यवतमाळ वनपरिक्षेत्राचे अधिकारी चौढाई, क्षेत्रसहाय्यक ओ.बी. पेंन्दोर, वनपरिक्षेत्र अधिकारी मडावी, लाडखेडचे ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे, लासीन्याचे उपसरपंच सुखलाल राठोड यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी पंचनामा करून सातवर्ष वयाच्या बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. काही दिवसापासून बिबट्याचे या शिवारात वावर असल्याने नागरिकामध्ये दहशत पसरली होती. दरम्यान आज मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.










One Response to लासीना शिवारात बिबट्याचा मृतदेह