दिग्रस (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यतील हरसूल येथील जळालेल्या नवविवाहीतेचा आज यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी सदर महीलेच्या पतीसह सासूला जवकरच अटक करणार असल्याची माहीती पोलिसांनी दिली.
निकीता गिरीष दुधे असे विवाहित महिलेचे नाव आहे. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता दरम्यान निकिताला जळालेल्या अवस्थ दिग्रसच्या ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. मात्र ती ७७ टक्के जळाली असल्याने तीला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. पवन तायडे याने दिलेल्या तक्रारीवरून दिग्रस पोलिसांनी आरोपी पती गिरीष दुधे, सासू सुरेखा दुधे याच्याविरूद्घ भादंवि कलम ४९८ (अ), ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान आज ७ नोव्हेंबर रोजी निकीताचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी आरोपीविरूद्घ पुन्हा ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला.










