अट्टल चोरट्यास अटक

यवतमाळ – शहरात घरफोडून चोरी करणाºया चोरट्यास शहर पोलीसांनी काल रात्री अटक केली. सचिन तुळशिराम भांडेकर (३०) रा. देवीनगर लोहारा ह.मु. वंजारी फैल असे आरोपीचे नाव आहे. कविता देवराव नेहारे (२७) रा. वंजारी फैल या महिलेच्या घराचे टिनपत्रे वाकवून चोरट्याने आत प्रवेश केला. त्यामधून मनिडोरले व २ हजार ५०० रुपये असा एकुण १० हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेला होता.  शहर ठाण्याचे पथकाने गस्ती दरम्यान दारव्हा रोडवर सचिनला अटक करून मनिडोरले जप्त केले.  जिल्हा न्यायालयात हजर करून १२ फेबु्रवारी पर्यंत त्याची पोलीस कोठडी मिळविली. कोठडी दरम्यान चार ठिकाणी चोरी केल्याची कबुली सदर आरोपीने दिली. ही कारवाई शहरचे ठाणेदार पंजाब डोंगरदिवे याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण शुंकर, संजय जाधव यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


8 − eight =