अपघातात दोन ठार

यवतमाळ –  जिल्ह्यात विविध अपघातातमध्ये दोन जण ठार झाल्याच्या घटना नुकत्याच घडल्या. राळेगाव तालुक्यातील वाढोणा बु. येथे अज्ञात वाहनाने निलेश भाईमारे यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये जखमी  झालेल्या निलेशचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कवडू नथ्थुजी निम्मनवार (५०) रा. टकळी यांच्या तक्रारीवरून वडकी पोलिसांनी वाहन चालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला. तसेच यवतमाळ येथील कोहीनुर सोसायटी जवळ एम.एच. २९ टी ३२५३ क्रमांकाच्या वाहनाने अब्दुल सत्तार रा. तायडे नगर यांना धडक दिली. यामध्ये ते जखमी झाले असून उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिसांनी चालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


7 + five =