अफगाणिस्तानात आत्मघाती हल्ला

images.jpeg333
काबूल – तालिबानी दहशतवादाने पोळलेल्या अफगाणिस्तानला रविवारी आणखी एक जबरदस्त हादरा बसला. व्हॉलीबॉल सामना सुरू असताना दहशतवाद्यांनी एका स्टेडियममध्ये घुसून केलेल्या आत्मघाती बॉम्बहल्ल्यात तब्बल ४५ लोक ठार झाले आहेत. तर ५०हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील पकतिका प्रांतातील एका स्टेडियममध्ये हा हल्ला झाला. व्हॉलीबॉल स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी शेकडो व्हॉलीबॉल रसिकांनी स्टेडियममध्ये गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा घेऊन एक आत्मघाती बॉम्बर प्रेक्षकांमध्ये घुसला आणि त्याने स्वत:जवळच्या स्फोटकांचा स्फोट घडवून आणला. मृतांमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


four × = 28