‘अब की बार मोदी सरकार’ अडचणीत

10155606_730534226986237_465472456_n
अलहाबाद – दूरचित्रवाहिनी आणि सोशल मिडीयावर वारंवार दाखवली जाणारी ‘अब की बार मोदी सरकार’ ही जाहीरात अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. या जाहीरातीतील अब की बार मोदी सरकार या घोषवाक्यावर अभिनव यादव नावाच्या एका तरुणाने आक्षेप घेतला आहे.
मोदी ही गुजरातमधली एक जात असून भाजपच्या या घोषवाक्यातून फक्त त्या जातीचा प्रचार होत असल्याचा आक्षेप या तरुणाने घेतला आहे. अभिनवने या घोष वाक्याविरोधात निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार नोंदवली आहे. भारत एक धर्मनिरपेक्ष देश असून, जाहीरातीतील या घोषवाक्यामुळे जातीच्या राजकरणाला प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे या घोषवाक्यावर बंदी आणण्याची मागणी अभिनवने निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगाने अभिनवच्या तक्रारीची दखल घेतली असून, त्याने नोंदवलेल्या आक्षेपांचा तपास सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


3 × = three