
श्रीनगर- अमरनाथ यात्रेत जाणा-या तीन यात्रेकरूंचा मृत्यू झाला. यामुळे यंदा या यात्रेत बळी गेलेल्या यात्रेकरूंची संख्या २५ वर गेली आहे. वडोदरा येथील सरोजिनी जी यांचा शनिवारी सायंकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तर दोन पुरुष यात्रेकरू शुक्रवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. या यात्रेकरूंची ओळख पटलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, २८ जूनपासून सुरू झालेल्या यात्रेत आतापर्यंत दोन लाख भाविकांनी ‘बाबा अमरनाथ’ यांचे दर्शन घेतले आहे.









