अमरावतीत सापडले ७६ लाख

images
अमरावती- निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असताना शहरात ७६ लाख रुपये रोख सापडल्याने महापालिकेच्या निवडणुकीची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून येत आहे. अमरावती महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळीही असेच एक कोटी रुपये अमरावतीत एका वाहनातून जप्त करण्यात आलेले होते. तथापि, ही रक्कम कोणत्या उमेदवाराची, हीच चर्चा आज सर्वत्र होती. वृत्त लिहीपर्यंत या रकमेचा उद्देश व ती कुणासाठी अमरावतीत आली, याचा उलगडा होऊ शकला नाही. अर्जुननगर सीलिंग पॉइंटवर पोलिसांनी एका कारमधून ७५ लाख ६४ हजार ६०० रुपये एवढी रोख जप्त केली. चालकासह रक्कम घेऊन येणा-या तिघांना पोलिसांनी पकडले. हे तिघेही नागपूरचे आहेत. महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी अशाच स्वरूपात एक कोटी रुपयांची रोख पोलिसांनी पकडलेली होती. त्या रकमेवर आजपर्यंत कोणीही दावा केलेला नसल्याने ही रक्कम आधी अनेक महिने ट्रेझरीत व त्यानंतर बँकेत पडून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


five × 4 =