अयनुद्दीन सोलंकी कुर्लीच्या सरपंचपदी

AynuddIn Solanki
घाटंजी दि. ६ (प्रतिनिधी) – तालुक्यातील कुर्ली येथील अयनुद्दीन रामसुद्दीन सोलंकी यांची कुर्ली ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार ए.बी. वीर हे होते. तर मंडळ अधिकारी व्ही. बी. रत्नपारखी, ग्रामसचिव रमेश गणवीर, तलाठी भारत लढे आदींनी सरपंच पदाच्या निवडणूकीत सहकार्य केले. यावेळी पारव्याचे ठाणेदार एल.डी. तावेर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सोलंक यांनी आपल्या निवडीचे श्रेय केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर आ. प्रा. राजू तोडसाम, भाजपाचे जेष्ठ नेते अशोक यमसनवार यांना दिले आहे. यापुर्वी घाटंजी तालुका रोजगार हमी  योजना समितीचे अध्यक्ष, जिल्हा स्तरीय अन्नधान्य दक्षता समितीचे सदस्य, कुर्लीचे सरपंचपदही त्यांनी भूषविले आहे. विकासात्मक व वैयक्ति कामावर अधिकाधिक भर देऊन गावाचा विकास करण्याचा निर्धार सोलंकी यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


8 − five =