अ‍ॅटो चालकाची हत्या

images
वणी- वणी तालुक्यातील धुनकी येथील २४ वर्षीय तरुणाची हत्या करुन शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नेरड पुरड शिवारातील रेल्वे पटरीवर टाकण्यात आल्याची घटना दि़२९ मार्चला उघडकीस आली़
धुनकी येथे वास्तव्यास असणारे अ‍ॅटो चालक नरेंद्र दामोदर सरपटे हे आपल्या मामाकडे देवादेवीच्या कार्यक्रमासाठी दि़२८ मार्चला पूरड येथे गेले होते़ त्या रात्री तो कार्यक्रम आटोपून ते गावी परत जात असतांना अज्ञान आरोपीने त्यांच्या डोक्यावर व पाठीवर धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली़ व पुरावा नष्ट करण्यासाठी नेरड पूरड शिवारातील कायर-मुकूटबनकडे जाणाºया रेल्वे रुळावार तो मृतदेह आणून टाकला़ ही बाब आज दि़२९ मार्चला टूड्रा येथील पोलीस पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी शिरपूर पोलीसांना सुचना दिली़ तर मृतकाचे मामा चंद्रशेखर श्रीराम कोंगरे यांच्या तक्रारीवरुन शिरपूर पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुध्द भादवी ३०२, २०१ अन्वये गुन्हा नोंद केला असून तपास सुरु आहे़

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


1 − = zero