नवी दिल्ली – आंध्रप्रदेश विधानसभा निलंबित ठेऊन तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने शुक्रवारी घेतला. आंध्रप्रदेशचे विभाजन करुन स्वतंत्र तेलंगण राज्याची निर्मिती करण्याच्या निर्णया विरोधात एन.किरणकुमार रेड्डी यांनी आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्याची सर्व सूत्रे राज्यपाल ई.एस.एल नरसिम्हा यांच्याकडे असतील. आंध्रप्रदेशच्या विधानसभेची मुदत दोन जून २०१४ रोजी संपत आहे. निवडणूक आयोग पुढील आठवडयापर्यंत लोकसभा निवडणूकांबरोबर आंध्रप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे.किरणकुमार रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाबरोबर काँग्रेसच्या आमदारकी, सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. संसदेने हिवाळी अधिवेशनात आंध्रप्रदेशचे विभाजन करुन स्वतंत्र तेलंगण राज्याच्या निर्मितीचे विधेयक मंजूर केले. तेलंगण देशातील २९ वे राज्य आहे.









