आठ कामगारांना विषबाधा

IMG-20141125-WA0028_resized
झरी – तालुक्यातील लहान पांढरकवडा येथील मे.बी.एस.इस्पात लि. च्या खासगी कोळसा खाणीत काम करणाºया आठ कामगारांना दूषित पाणी पिल्याने विषबाधा झाली. विषबाधा झाल्यानंतर कामगारांना उलट्या होने सुरू होताच त्यांना मुकुटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वेळेवर उपचार मिळाल्याने आता सर्वच कामगारांची प्रकृती चांगली असून त्यांना सुट्टी देण्यात आली. प्राप्त माहितीनुसार कोळसा खाणीतील कामगार जिथे पाणी पितात त्या पाण्याच्या टाकीत पाल पडली होती. ते पाणी पिताच कामगारांना उलट्या सुरू झाल्या. विषबाधा झालेल्या कामगारांमध्ये प्रफुल चौधरी, मुकेश बोरकुटे, सुमित गोंडे, विनोद   गोंडे, चंद्रकांत डवरे, प्रदीप खडसे, गणेश मडकाम, संतोष राजूरकर यांचा समावेश आहे. कामगारांना सामाजिक कार्यकर्ता अनिल पावडे, सुरेश चामाटे, दीपक चांदेकर, कोळसा खाणीचे व्यवस्थापक आकाशदीप, मोरेश्वर कस्तुरे यांनी मुकुटबनच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. डॉक्टर जोगदंड यांनी कामगारांवर वेळेवर उपचार केल्याने मोठा अनर्थ टाळता आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ six = 13