आता इंजेक्शन न टोचता घेता येईल लस

17072015-md-am-9-17962-1-large
इंजेक्शन टोचून घ्यायचे म्हटले की, लहान मुलेच नाही तर मोठय़ांचेसुद्धा हातपाय थरूथरू लागतात. म्हणूनच बर्‍याचदा इंजेक्शनऐवजी गोळ्यांची मागणी केली जाते. मात्र या समस्येवरचा उपाय शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे. त्यांनी एक अतिशय सूक्ष्म सुई असलेली पट्टी विकसित केली असून ती त्वचेमध्ये सहजपणे मिसळून जाईल. जपानच्या ओसाका विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या अनोख्या प्रकारची पट्टी तयार केली असून वेदनादायी इंजेक्शनला ती पर्याय ठरेल, असा त्यांचा दावा आहे. त्वचेमध्ये मिसळणारी ही पट्टी लसीकरण अधिक सोपे, सुरक्षित आणि कमी वेदनादायी बनविण्यास सक्षम आहे. बहुतांश लस सुईच्या मदतीने त्वचा वा स्नायूंमध्ये दिल्या जातात. ही पद्धत प्रभावी असली तरी त्यासाठी व्यक्ती धिराची व दक्ष असणे गरजेचे असते. कारण सुई घेण्याच्या नावानेच अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. मात्र ही नवी सूक्ष्म सुई असलेल्या पट्टीला विरघळणार्‍या पदार्थांपासून बनविण्यात आली आहे. त्यामुळे तिच्यामध्ये सुईशी संबंधित कोणत्याही धोक्याची शक्यता नाही. या पट्टीचा वापर करण्यासाठी वैद्यकीय दक्षतेचीही गरज नाही. या संशोधनाचे प्रमुख शिंसाकू नकागावा यांनी सांगितले की, या पट्टीची सुगमता पाहता लसीकरणाला चालना देण्यासाठीही तिचा वापर केला जाऊ शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


four × = 12