आता डिझेलवरील आॅटोनाही मिळणार परवानगी

पेट्रोलवरील रिक्षा चालवण्याची अट शिथिल
यवतमाळ – पूर्वी पेट्रोलवरील रिक्षांनाच परवाना मिळत होता, मात्र परिवहन विभागाने ही अट शिथील केली आहे. त्यामुळे आता डिझेलवर धावणाºया आॅटोंनाही परवानगी मिळणार असून चालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पेट्रोल व डिझेलवरील आॅटोचे भाडे सारखेच राहणार असल्याने प्रवाशांसाठी आॅटोचालकांत वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यवतमाळ जिल्ह्यात १९७० मध्ये आॅटो व्यवसाय सुरु झाला. परिवहन विभागाकडून फक्त पेट्रोलवर धावणाºया आॅटोंनाच परवानगी मिळत होती. आजमितीस जिल्ह्यात हजारो आॅटो असून भाड्याचे दर  पेट्रोलच्या किमतीवरून ठरविण्यात आले आहे. नविन रिक्षा परवान्यांवर डिझेल आणि एलपीजी रिक्षाही चालवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी अनेक आॅटोरिक्षा युनियनने परिवहन आयुक्ताकडे केली होती. या पार्श्वभूमिवर गुरुवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, परिवहन सचिव शैलेश कुमार शर्मा आणि परिवहन सचिवाची बैठक पार पडली. या मध्ये नविन आॅटोरिक्षा परवान्यांवर फक्त पेट्रोलवरील रिक्षा चालवण्याची अट राज्य शासनाने शिथिल केली.त्यामुळे आता डिझेल वरील आॅटोंनाही परवाना मिळणार आहे. त्यामुळे आॅटो चालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मात्र दोन्ही आॅटोच्या भाड्याचे दर हे सारखे राहणार आहे. पेट्रोलवर आॅटो चालविणाºया चालक-मालकाला परवडणार नसून डिझेलवरील आॅटो चालविणाºयाचा फायदा होणार आहे.  त्यामुळे प्रवाशी नेण्यावरून चालक-मालकामध्ये वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी प्रतिक्रीया आॅटो युनियनचे उपाध्यक्ष भारमल स्वामी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


three + 6 =