
नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणूकीसाठी आम आदमी पक्षाने चौथी उमेदवार यादी जाहीर केली आहे. इन्फोसिसचे माजी अधिकारी व्ही. बालकृष्णन यांना आपने लोकसभेचे तिकीट दिले आहे. ते मध्य बंगळुरूतून निवडणूक लढवणार आहेत.
तहलकाचे माजी पत्रकार आणि गुलैल संकेतस्थळाचे संस्थापक आशिष खेतान यांना आपने नवी दिल्लीतून उमेदवारी दिली आहे. दिल्लीतील आपच्या सहा उमेदवारांपैकी तीन उमेदवार पत्रकार आहेत. टीव्ही पत्रकार आशुतोष चांदनी चौकमधुन, जर्नेल सिंह पश्चिम दिल्लीतून आणि आशिष खैतान नवी दिल्लीतून निवडणूक रिंगणात आहेत. पंजाबचे प्रसिध्द विनोदी कलाकार भागवत मान यांनाही आपने संगरुरमधुन तिकीट दिले आहे. लोकसभा निवडणूकीसाठी आपने आतापर्यंत १३१ उमेदवार जाहीर केले आहेत.









