आप’च्या नेत्यांना न्यायालयाची नोटिस

नवी दिल्ली- अब्रू नुकसानीच्या दाव्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह मनीष सिसोदिया, प्रशांत भूषण, शझिया इलमी यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नोटिस बजावली. केंद्रीय मंत्री कपिल सिबल यांचे पुत्र अमित यांनी ‘आप’च्या नेत्यांविरोधात याचिका दाखल केली.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एच. एल. दत्तू यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले. १६ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत अब्रू नुकसानीच्या दाव्याची याचिका रद्द करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. मात्र, ही याचिका रद्दबातल करण्याचा निर्णय महानगरदंडाधिका-यांनी घ्यावा असे उच्च न्यायालयाने सूचवले.दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालाला अमित सिबल यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. खासगी तक्रारीवरून महानगरदंडाधिका-यांना हा खटला रद्दबातल करण्याचे अधिकार नसल्याचा दावा सिबल यांनी केला. वडिलांच्या मंत्रिपदाचा फायदा अमित सिबल यांनी घेतल्याचा दावा केजरीवाल व ‘आप’च्या नेत्यांनी केला होता. त्या विरोधात अमित सिबल यांनी याचिका दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


8 − = four