आमदार पुत्राच्या वाहनाची दुचाकीला धडक , एक ठार

 

वणी (यवतमाळ)- तालुक्यातील विकास कामाच्या भूमी पूजनाकरीता घोन्सा या गांवाकडे जात असलेल्या आमदाराच्या ताफ्यातील आमदार पुत्राच्या वाहनाची दुचाकीला धडक लागून ३५ वर्षीय युवक ठार झाल्याची घटना दि़३ मार्चला दुपारी ११ वाजताच्या दरम्यान घडली़.
आचार संहितेचा धसका घेवून विद्यमान आमदारांनी विकास कामाच्या भूमीपूजनाचा धडाका लावला आहे़ एकाच दिवशी अनेक गांवात भूमी पूजन असल्याने वेळेत पोहचण्याची घाई आमदारासह कार्यकर्त्यांना झाली आहे़ यामुळे भरधाव वेगाने वाहने चालविण्याची वेळ त्यांचावर येवून ठेपली़ यामुळेच रासा गांवाजवळ निष्पाप वेकोली कर्मचाºयाला आपला जीव गमवावा लागला़
येनक गांवातील युवक वेकोलीच्या कुंभारखाणी वसाहतीत वास्तव्यास आहे़ तो व त्याचा मित्र दुचाकी क्ऱएमएच ३४ एएच २३०१ या वाहनाने वणीकडे कामानिमित्त जात असतांना विरुध्द दिशेने भरधाव वेगात येत असलेले आमदार पुत्राचे बोलेरो वाहन क्ऱएमएच २९ एडी ५०५ हे रासा येथील वरारकर यांच्या शेताजवळील वळणावर अचानक पुढे आल्यामुळे दुचाकी चालक साईनाथ ठाकरे याने करकच्चून ब्रेक मारला़ मागे बसलेले गंगाधर रामू सोनटक्के उसळून चारचाकी वाहनापुढे पडल्याने ते चिरडल्या गेले़ गंभीर जखमी अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले़ तर वाहन चालक प्रशांत वल्लपकर यांचेवर पोलीसांनी भादवी कलम २७९, ३०४ अ, अन्वये गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली़
यावेळी ग्रामीण रुग्णालयासमोर वेकोली युनियनचे सदस्य व मृतकाच्या नातेवाईकांनी आर्थीक मोबदला मिळाल्याशिवाय शवविच्छेदन करु देणार नाही अशी भूमिका घेतल्याने काही वेळ ग्रामीण रुग्णालयासमोर वातावरण संतत्प झाले होते़.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


8 × = sixteen