

यवतमाळ – क्रिटीकेअर रुग्णालयाचे संचालक डॉ. टी. सी. राठोड यांची इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य अध्यक्षपदी तर डॉ. अजित फडके यांची महाराष्ट्र आर्थोपेडिक असोसिएशनच्या राज्य अध्यक्षपदी निवड झाली. डॉ. फडके सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ असून, १९८३ मध्ये पुणे येथील बीजी रुग्णालयात त्यांनी एम.एस. केले. राज्य ते राष्टÑ पातळीवर अनेक वैद्यकीय उपक्रमांमध्ये सहभागी होऊन सन्मान मिळवले आहेत. तर डॉ. राठोड मधुमेह रोगतज्ज्ञ असून, १९७९ मध्ये नागपुरातून त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. जपान आणि जमर्नीमध्ये त्यांनी मधुमेह रोगावर भारताचे प्रतिनिधित्व केले. शिर्डीतील साईबाबा संस्थानचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी धुरा सांभाळली आहे. डॉ. राठोड आणि डॉ.फडके यांचा विविध सामाजिक कार्यामध्ये पुढाकार असतो. पुणे येथे २२ नोव्हेंबर रोजी आयोजीत कार्यालयात आपल्या अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळणार आहेत.
राज्याध्यक्ष ह्या महत्वाच्या पदावर काम करतांना वैद्यकीय व्यवसाय अधिकाअधिक लोकाभिमुख व्हावा यासाठी आणि मधुमेह या आजाराविषयी लोकजागरण करण्याचा मनोदय डॉ. राठोड यांनी व्यक्त केला. तर डॉ. फडके यांनी अस्थिव्यंगोपचारविषयक अद्यावत ज्ञान ग्रामीण भागातील वैद्यक व्यावसायीकापर्यंत पोहचविणे व त्याद्वारे तेथील सेवेत सुधारणा घडवून आणण्याचा मानस व्यक्त केला.









