आयुष्याची सार्थकता-किशोर वैद्य

23
साहित्यांकाच्या भावविश्र्वात शहराविषीयीच्या विशिष्ठ संवेदना साकार झालेल्या असतांत. ते ज्या शहरात राहतात त्या शहराविषयी विलक्षण अस्मीता त्यांच्या मनात निर्माण झालेली असते. शहराविषीयी ज्या अपार आपुलकीने त्यांच्या मनाचा एक कोपरा सदैव काहीना काही करण्याची धडपड करीत असतो. अशाच सहित्यीकाच्या प्रवासातील एक नाव किशोर गंगाधर वैद्य बि.ए.बी.एड.सेवानिवृत्त प्राचार्य विकास हिंदी कनिष्ठ महाविद्यालय पांढरकवडा त्यांच्या अमृत महोत्यव ७५ च्या पर्वावर त्यांच्या परिचय नव्याने व्हावा आणी त्यांना सर्वार्थान शुभेच्छांनी गौरविला जाव हा ह्या मागचा उद्देश प्राचार्य पदाची धुरा सांभाळता साभाळता आयुष्यातल्या हौसेच्या मोलाला ते विसरले नाही. अनेक खाचर वळग्यातुच जिवनाचा प्रवास सुरू केला. आयुष्यात काहि गमावल्या शिवाय कमावता येत नाही म्हणतात स्वत: च्या अनुभवला समोर जाताना काटे दुर करीत वाटचाल करीत राहिले मागे वळुन न पाहता आज त्यांच्या यशस्वी जिवनाचा आलेख इतका मोठा झाला आहे. उंचावत गेलाय की त्यांची मुले सुध्दा म्हणतात हेच आमचे बाबा आहेत आमच्यासाठी वंदनीय स्वत:ही घडवित असताना कुटुंबाची जबाबदारी त्यांनी कधी नाकारलीच नाही. त्यांची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी झटत राहीले मुलांना चांगल यशस्वी जिवन देवून मोठ्या जबाबदारीतुन मुक्त झाले. किशोर गंगाधर वैद्य व्यक्ती म्हणून मान्य आहेतच पण अनेक भुलावलेल्या पदांचा मानकरी आहे. नगर परिषद पांढरकवड्याचे शिक्षण सभापती नागपूर विद्यापिठाचे सीनेट सदस्य गो.क.ग न्यासचे विश्वस्त सचिव दत्त मंदिर न्यास दक्षता व शांतता कमिटी सदस्य समर्थ ब्रम्हचारी महाराज न्यास चिंचमंडळ स्वा.सावरकर प्रेमी मित्र मंडळाचे पदाधिकारी होते. सन १९६४ आॅल इंडिया खो-खो व कबड्डी चॅपीयन शिप करता त्यांची ठाणे येथे निवड चालु होती. यवतमाळ जिल्हा न.प.प्रतिनिधी म्हणून पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांचे निमंत्रावरुन दिल्ली येथेल सम्मेलन १९८९ मध्ये त्यांची उपस्थिती होती. देशासाठी आपण काही देणे लागतो ह्या प्रमाणे सन १९६७ गोवा येथे मुक्तीवर मोहन रानडे यांचे सोबत विदर्भात प्रवासही केला. सन १९७५ ते १९७७ आणी बाबीत १३ महीन्यांचा तुरुंगवासही त्यांनी भोगला. कधी कधी आपल्या जवळपास वावरणारी व्यक्ती इतकी मोठी असते हे लक्षात येत नाही. आणी म्हणूनच अशा लिखाणाची गरज असते. सहित्सीक म्हणून मी त्यांचा उल्लेख केला त्यांची स्वत:ची काही पुस्तके आहे.(१) भारतीय स्वातंत्र्याची गाथा असे झुंजले चिमुर २००२ (२) प्रवास मोक्षधामाचा ह्या पुस्तकातील मृत्युं नंतर घडणाºयां घडामोडीचा आलेखच त्यांनी मांडलाय सामाजिक न्याय मंत्री अ‍ॅड.शिवाजी मोघे ह्यांनी त्यांच्या मनोगतातुन मोक्षधामाची व्यथा अगदी मार्मीक शब्दात मांडुन किशोर वैद्यानां न्याय दिला आहे. ते म्हणतात कोणा एकाचा मृत्युं झाला हे वैद्यंना कळायचीच वेळ वैद्य जात पात पक्ष सर्व बाजुला ठेवून हजेरी लावयाचे एखाद्या अनुपस्थित दिसले तर त्यांचे गैरहजेरीची चर्चा होते. असे लोक म्हणत प्रारंभापासून ते श्रध्दांजलीपर्यंत त्यांनी आत्तापर्यंत हजारो अत्येष्टी पार पाडण्यात प्रसंगी स्वत:चे पैसेही खर्च केले यापेक्षा मोठा दुसरा सामाजिक कार्य कोणते असु शकेल. व्यक्त करीत असताना किशोर वैद्यांना अलेले बरे वाईट अनुभव त्यांनी प्रवास मोक्षधामाचा ह्या पुस्तकात लिहिले आहे.प.पु माधव महाराज व माया चे छायाचित्र असलेले पाटणबारीचा पावन मठ हे पुस्तक लिहुन खाºया अर्थाचे जिवनाचे सार्थक करून घेतले असेही म्हणाला हरकत नाही. पत्रकारीतेच्या क्षेत्रातही ते मागे नाही दै.लोकमत, दै.लोकदूत, लोकसत्ता, सकाळ वरुन भारत, नवभारत, नागपूर पत्रिका आणी केळापूरचे वारे या वर्तमानपत्राचा प्रतिनिधी म्हणून प्रदिर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. नागपूर व यवतमाळ आकाशवाणीवर साक्षरता अभियाना अंतर्गत मुलाखतीचे प्रसारण त्यांनी त्यांच्या वाटचालीत अनेक पुरस्कार हि ळिविले. त्यात प्रामुख्या तिन वेळा आदर्श शिक्षक, पौढ शिक्षण साधण व्यक्ती पुरस्कार, स्वतंत्र्य भारताच्या उभारणी दुर संचार विभागाचे योगदान, उपमुख्यामंत्री गोपीनाथ मुडे यांचे उपस्तितीत सन्मानपत्र, जेष्ठ पत्रकार सन्मानपत्र , यवतमाळ जिल्हा ब्राम्हण सभेचा समाजभूषण पुरस्कार त्यांचे नावावरआहे. मॉरीशस, अंदमान, श्रीलंका, लंडन, इंटली, फ्रान्स, आॅस्ट्रीया,वॅटीगनसिटी, स्विर्त्झलँड, हॉलंड, युरोप देशांचे यात्राचे भ्रमणही केले. त्यांच्या शिक्षण पेशासोळयात लेखक साहित्यीक पत्रकार सामाजिक कार्यकर्ता देशाप्रती जबाबदारी भावना जपणाºया ह्या हुरहुन्नरी कलावंताचा त्यांच्या असमान्य व्यक्तीमत्वाला त्यांच्या पुढील उज्वल भविष्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा! अमृत मोहोत्सवा निमित्य अभिष्ट चिंतन !
श्रीमती शुभदा मुंजे, यवतमाळ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


four + 2 =