आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावास

imagesयवतमाळ – पारवा येथील दोन भावंडावर प्राणघातक हल्ला करणाºया आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.टी. बारणे यांनी आज शुक्रवारी हा निकाल दिला.
हनुमान पांडूरंग पेंदोर रा. पारवा असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. १ एप्रिल २०१२ रोजी ढोल ताशे मंडवितांना अविनाश चंद्रभान सोयाम, गजानन चंद्रभान सोयाम या दोन्ही भावंडावर चाकुने वार करुन प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी भादंवि कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी अे.जी. कोळथळकर यांनी आरोपीला अटक करुन प्रकरण न्यायप्रविष्ठ केले होते. येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.टी. बारणे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यामध्ये एकुण ९ साक्ष तपासण्यात आल्या. त्यापैकी घटनास्थळ व जप्ती पंचनाम्यावरील साक्षदार फितूर झाला. मात्र जखमी व डॉक्टरांची साक्ष ग्राह्य धरुन आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारीपक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील नरेंद्र मेश्राम यांनी युक्तीवाद केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


five × 4 =