दोन आरोपीकडून सहा लाखाचा मुद्देमाल जप्त
यवतमाळ – आर्णी तालुक्यात चोºया करून पोलिसांची झोप उडविणाºया दोन अट्टल घरफोड्यास अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून ५ लाख ७७ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शेख अक्तर शेख मुक्तार (२४) रा. वसंतनगर, पुसद, जब्बार खान उर्फ काल्या मजित खान (२६) रा.मधुकरनगर पुसद असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहे.
मागील काही महिन्यात आर्णी तालुक्यात घरफोडीच्या घटनात कमालितची वाढ झाली होती. चोरीच्या वाढत्या घटनामुळे आर्णी पोलिसांची झोप अक्षरश: उडली होती. तर चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलीसाना यश येत नसल्याबद्दल रोष व्यक्त होत होता. आर्णी तालुक्यात चोरी करणाºया चोरट्यांबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला महिती मिळाली. त्या माहितीच्या आधारावर आदिलाबाद येथील तुरुंगातून दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेतले. आरोपींना अटक केल्यानंतर खाकीचा हिसका दाखविताच १२ गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. त्यांच्याकडून १८४ ग्रॅम सोने, ५०० ग्रॅम चांदी असा एकूण ५ लाख ७७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुन्हा चोरीच्या काही घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्राने वर्तविली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या आदेशाने व पोलीस निरीक्षक संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी लष्करे, सहाय्यक फौजदार भीमराव सिरसाट, मिलिंद गोफने, नितीन सलाम, भोजराज करपते, रेवन जागृत, प्रदीप तांबेकर यांनी केली.










