आर्यरुप टुरिझमचा २४ लाखाचा घोटाळा ९० लाखावर

सिआयडी मुख्यसुत्रधाराच्या मागावर
यवतमाळ – आर्यरुप टुरिझम कंपनीचा २४ लाखाचा घोटाळा आता ९० लाखावर पोहचला असून पोलिसांनी राज्यात ४३ गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणाचा तपास सिआयडी करीत  असून कंपनीच्या फरार चार मुख्य संचालकांचा मागावर आहे.
१ जानेवारी २००९ रोजी आर्यरुप टुरिझम कंपनीची स्थापना सातारा जिल्हयातील खटावा येथील रविंद्र शिवाजीराव देशमुख, त्याच्या पत्नी वसुधा उर्फ वैशाली देशमुख व उदयसिंग नारायण घोरफडे रा. कोरेगाव (बाहुली) जि. सातारा, भाटी यांनी स्थापन केली होती. मुंबई येथे या कंपनीचे मुख्य कार्यलय असून नेट बँकीगद्वारे संपूर्ण व्यवहार सुरु होते. या कंपनीच्या एजंटनी ग्रामीण भागातील नागरिकांना हेरून कंपनीत जमा केलेल्या रक्कमेची दामदुप्पट  देण्याचे आमिष दाखविले. या अमिषाला बडी पडून अनेक व्यक्ती, व्यापारी, व्यावसायीकांनी लाखो रुपये गंतवणूक केली. निर्धारीत कालावधीत ग्राहकांनी नेटवर अकांऊटवरील रक्कम पाहिले असता तेथे दामदुप्पट रक्क्मेची नोंद दिसायची. मात्र बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता त्यामध्ये रक्कम जमा केली नसल्याचे उघड होत होते. याप्रकरणी पंजाबराव देशमुख (खडकेकर) यांनी पुसद शहर पोलीस ठाण्यात या कंपनीच्या विरोधात तक्रार दिली होती. यावेळी २४ लाख रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीचे चारही संचालक, मुंबईचे लेखापाल नितीन गुप्ते, एजंट विनायक गणपत बोन्सले रा. विडूळ  ह.मु. वसंत नगर उमरखेड यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणी  प्रथम पुसद शहर पोलिसांनी तपास केला. मात्र या गुन्ह्याची व्याप्ती राज्यभर असल्याने तपास सिआयडीकडे देण्यात आला. राज्यात या कंपनीविरूद्घ ४३ गुन्हे दाखल झाले असून ग्राहकांची ९० लाख रुपयाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी लेखापाल गुप्ते याला अटक केली असून मुख्यसुत्रधार देशमुख दाम्पत्य, घोरफडे, भाटी व एजंट बोन्सले हा तेव्हापासून फरार होता. सिआयडीचे पथक त्याच्या मागावर असून कसुन शोध घेत आहे. या पथकाने यापूर्वीच कंपनीचे कार्यालय, शेती, मालमत्ता सिल केले असून बँकेचे खातेही गोठविल्याची माहिती सिआयडीचे पोलीस उपअधिक्षक सुरेश इंगळे यांनी दिली.  सिआयडी पथकाने काल एजंट विनायक गणपत बोन्सलेला  अटक केली व न्यायालयात हजर करून १५ फेबु्रवारी पर्यत सिआयडी कोठडी मिळविली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× six = 12