आसाममध्ये अपघातात ११ कलाकारांचा मृत्यू

mahad-accident

गुवाहाटी – पश्चिम आसाममधील गोलपारा जिल्ह्यातील धुपधारा येथे बुधवारी पहाटे कलाकारांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात ११ कलाकारांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये उदयोन्मुख गायक सुमन महंताचा समावेश आहे.

पहाटेच्या सुमारास धुपधारा येथील रस्त्यावर कलाकारांना घेऊन जाणारे प्रवासी वाहन आणि ट्रकची समोरासमोर टक्कर झाली. ही टक्कर इतकी जबरदस्त होती की, कलाकारांच्या गाडीतील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. दोघांचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला.

एका जखमीवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुस-या जखमीची प्रकृती गंभीर असून, त्यांना गुवहाटीच्या वैद्यकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रक चालक ट्रक तेथेच सोडून घटनास्थळावरुन पसार झाला होता. पण नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


4 − = one