आसारामबापू प्रकरणातील साक्षीदारावर अ‍ॅसिड हल्ला

asaram-bapu-arrest_123
सुरत – लैंगिक शोषण प्रकरणात तुरुंगात असलेले स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू प्रकरणातील साक्षीदार दिनेश वागचंदानी यांच्यावर रविवारी अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला.
वागचंदानी हे मोटारसायकलवरुन त्यांच्या घरी जात असताना दोन व्यक्तींनी त्यांच्यावर अ‍ॅसिड फेकले. हल्ल्यात जखमी झालेल्या दिनेश यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तुरुंगात असलेले आसारामबापू यांच्याविरुद्ध दिनेश यांनी साक्ष दिली होती. साक्षीदारांवर करण्यात आलेला हा तिसरा हल्ला आहे. याआधील राकेश पटेल या साक्षीदारास चाकूने जखमी करण्यात आले होते.आसाराम बापू यांना अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोपाखाली ऑगस्ट २०१३ मध्ये अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


6 − six =