
यवतमाळ – भरधाव वेगात असलेला आॅटो उलटल्याने सात जण जखमी झाल्याची घटना आज मंगळवारी दुपारी २ वाजता हातगाव येथे घडली.
स्वप्नील भगत, गजानन रिंगणे, विलास वाघमारे, प्रविण वाघमारे, भूषण तितरे, शुभम नगराळे, आशिष नगराळे अशी जखमींची नावे आहे. लोणी घाटाना येथून एम.एच. २९ / टि ८०९३ क्रमांकाच्या आॅटोने ते अकोला बाजारकडे जात होते. अशातच हातगाव या गावाजवळ भरधाव वेगात असलेला सदर आॅटो उलटला. यामध्ये सातही जण जखमी झाले असून त्याच्यावर वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहे. शहर पोलिसांनी या प्रकरणी चालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला.









