
महागांव, दि. १२ – प्रवाशी घेऊन जाणारा आॅटो गतिरोधकावर उलटल्याने चालक ठार झाल्याची घटना आज गुरूवारी सकाळी ७ वाजता खडका फाटयावर घडली.
प्रमोद प्रकाश गायकवाड (२२) रा. खडका असे मृतकाचे नाव आहे. तो अॅटो चालवुन आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करत होता. नेहमी प्रमाणे आज सकाळी ७ वाजता आॅटो घेवुन खडका फाट्यावर जात होता. अशातच पुसद-माहुर रस्त्यावर शेतामध्ये पाणी सोडण्यासाठी नाली खोदण्यात आली. नाली बुजविण्यात आल्यानंतर तेथे गतिरोध प्रमाणे रस्ता झाल्याने अॅटो उलटला. यामध्ये जखमी झालेल्या गायकवाड यांना पुसद येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली.









