आ. राठोड यांच्या वाहनाला अपघात, १ गंभीर, ४ जखमी

DSCN0158

नेर –  यवतमाळवरून शिर्डी येथे जाणाºया आ. संजय राठोड यांच्या वाहनाला समोरून येणाºया गॅस टँकरने जबर धडक दिल्याची घटना आज दुपारी ३ वाजता फुटका माथा जवळ घडली. सुदैवाने या वाहनात आ. राठोड नव्हते. यात एक जण गंभीर असून, ४ जण जखमी आहे. जखमींना यवतमाळ रुग्णालयात हलविण्यात आले.
आ. संजय राठोड यांचा परिवार व नातेवाईक टोयटो फारर्चुनर वाहनाने शिर्डी येथे दर्शनाकरिता जात होते. यातील मागील वाहन क्र. एमएच २९ एक्स १११ या वाहनाला समोरून येणाºया गॅस टँकर क्र जीजे १२- २३४८ ने जबर धडक दिली. यात उमेश हांडा (४०) रा. यवतमाळ हा गंभीर जखमी असून, चालक शंकर मानकर (५५), देविदास जाधव (४१), प्रवीण चव्हाण (२४), अशोक राठोड (४०) सर्व रा. यवतमाळ जखमी झाले. जखमींवर यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. सदर घटनेची माहिती मिळताच बाबू पाटील जैत, स्रेहल भाकरे, भारत मसराम, भाऊराव ढवळे, प्रमोद राणे यासह शेकडोंनी घटनास्थळी धाव घेतली अपघात झाल्यानंतर आमदाराच्या परिवारातील व नातेवाईकांना शिर्डी दौरा रद्द करून यवतमाळ येथे परत गेले. अपघातानंतर लगेच टँकर चालक हिरालाल यादव (गांधीधाम) गुजरात याने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


four − 3 =