इचोरी घाटात दुचाकी चालकाला लुटले, राकाँच्या पदाधिकाºयांनी चोरट्यांना पकडले

download (2)
यवतमाळ, दि. १५ – यवतमाळवरून दारव्हा येथे जाणाºया दुचाकीचालकाला अडवून लुटल्याची घटना आज रविवारी इचोरी घाटात सायंकाळी ५ वाजता घडली. या बाबतची माहिती मिळताच राष्टÑवादी काँग्रेसच्या पदाधिकारी पप्पु उर्फ विवेक गावंडे यांनी पाठलाग करून लुटमार करणाºया तिन्ही आरोपींना पकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले.
आशीष नागेलवार (२६) रा. लोणबेहळ ता. आर्णी हा युवक आपल्या दुचाकीने (एम. एच. २९/ यू ५१५) यवतमाळवरून दारव्हा येथे जात होता. अशातच आज रविवारी सायंकाळी ५ वाजता इचोरी फाट्याजवळ घाटात एम. एच. ३१/ ३७०८ क्रमांकाच्या पल्सरने आलेल्या तीन युवकांनी आशीषची दुचाकी अडवून मोबाईल व एक हजार ५०० रुपये जबरीने हिसकावून घेतले. आशीषने हा प्रकार यवतमाळ येथील मित्र राष्टÑवादी काँग्रेसचे पदाधिकारी विवेक गावंडे यांना दिली. त्यावरून गावंडे आपल्या सहकार्यासह दारव्हा मार्गाने निघाले. अशातच जांबवाडी येथील धाब्यावर पल्सर उभी दिसताच आरोपींना पकडून यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या ताब्यात दिले. नरेंद्र बाळकृष्ण सुखदेवे (३३), नरेंद्र वसंत रंगारी (२८) रा. इचोरी, सैय्यद अजमल सै. अमन (३५) रा. यवतमाळ अशी आरोपींची नावे असून त्यांच्यावर लाडखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


5 × one =