ई-फायलींगच्या माहितीसाठी प्रकाशक संपादक कार्यशाळा

वाशीम : प्रसार माध्यमातील दैनिके व नियतकालीकांच्या वार्षिक विवरणीच्या लेखा परिक्षणासाठी रजिस्ट्रॉर ऑङ्ग न्युजपेपर्स कडून ऑनलाईन सुविधा उपलब्ध झाली असून हे लेखा परिक्षण ई-ङ्गायलींगच्या माध्यमातून सुरु करण्यात आले आहे. एप्रिल ते मार्च या कालावधीतील वार्षिक विवरणी लेखा परिक्षकांच्या तपासणीसह आरएनआय कार्यालयाला ३१ मे पर्यत ई-ङ्गाईलींगच्या माध्यमातुन कसे पाठवावे याबाबतची माहिती अद्यापही अनेक प्रकाशक व संपादकांना नाही. त्यामुळे नियमित कागदपत्रांची पुर्तता न करु शकणार्‍या यापैकी अनेक वृत्तपत्रांची नोंद आरएनआय कार्यालयाला होत नाही. व याचा ङ्गटका प्रकाशकांना बसतो. त्यासाठी आरएनआय कार्यालयाने ई-ङ्गायलींगच्या माहितीसाठी दि. २० ते ३१ मे २०१४ च्या दरम्यान आरएनआय  च्या दिल्ली येथील मुख्य कार्यालयामध्ये ई-ङ्गायलींग ङ्गॅसिलिटेशन कॅप (कार्यशाळा) चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत वार्षिक विवरणी इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन कशी भरावी याबाबतची सखोल माहिती देण्यात येणार आहे. तरी दैनिके व नियतकालीकांच्या प्रकाशक  व संपादकांनी या कार्यशाळेला उपस्थित राहून ऑनलाईन ई-ङ्गायलींगची माहिती जाणून घ्यावी असे आवाहन रजिस्ट्रॉर ऑङ्ग न्युजपेपर्स ङ्गॉर इंडिया नवी दिल्लीचे सहाय्यक प्रेस रजिस्ट्रॉर एस.डी.सुरेकर यांनी संकेतस्थळावरुन केले आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी आरएनआय डॉट एनआयसी डॉट कॉम या संकेतस्थळावर किंवा ०११-२६१०७५०४, २६१०८४३२, २६१६२६३२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


two × 7 =