ई-शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ

अंतिम मुदत 28 फेब्रुवार , संकेतस्थळ सुरु
यवतमाळ दि. 11 : समाजकल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 2013-14 साठी शिष्यवृत्ती व फ्रीशिप अर्ज सादर करण्यास 28 फेब्रुवारी 2014 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या संकेतस्थळ सुरु आहे. यानंतर मुदतवाढ मिळणार नसल्याने संबंधित विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांनी ई-शिष्यवृत्ती, फ्रीशिपचे फॉर्म मुदतीत भरुन घेवून सादर करावे असे आवाहन नितीन ढगे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांनी केले आहे.
ज्या विद्यार्थ्यांचे, महाविद्यालयाचे खाते क्रमांक आय.एफ.एस. कोड क्रमांक चुकलेले आहेत त्यांच्या रकमा बँकेकडून परत येत आहेत. तरी या चुकांची दुरुस्ती करुन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्याची कार्यवाही तातडीने करावी. तसेच उपयोगिता प्रमाणपत्र प्रवर्ग निहाय सादर करावे. ज्या महाविद्यालयाच्या पी.एल.ए. खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम शिल्लक असल्यास त्याचा कोषागार कार्यालय व महालेखापाल कार्यालयाच्या शिल्लक रकमेशी ताळमेळ करुन शिल्लक रक्कम चलानद्वारे भरावी. सन 2013-14 चे शिष्यवृत्ती/फ्रीशिपचे अर्ज ऑनलाईन भरुन सादर करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


2 + = three