उधारीच्या पैशावरून युवकाचा खून

download
यवतमाळ, दि. ७ – खºर्याच्या उधारीवरून चौघांनी संगणमत करून युवकाचा खून केला. ही घटना येथील धामणगाव मार्गावरील अभियांत्रीकी महाविद्यालयासमोर सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
नितेश उर्फ मिथून सुभाष मादेवार (३०) रा. पिंपळगाव असे मृतकाचे नाव आहे. तर संतोष नामदेव वडतकर (३५) रा. तलावफैल, सुरेंद्र गुबरे (२६) रा. वर्धा, सलमान (४०) रा. तलाव फैल, पन्नालाल जयस्वाल (४०) रा. मंगेश नगर भोसा अशी आरोपींची नावे आहेत. ६ एप्रिल रोजी सायंकाळी मृतक नितेश हा कॉटन मार्केट परिसरातील आरोपी संतोष वडतकर याच्या पानठेल्यावर खर्रा खाण्यासाठी गेला होता. यावेळी नितेशने खर्रा घेऊन पैसे न दिल्याने पानठेला चालक संतोषसोबत त्याचा शाब्दीक वाद झाला. दरम्यान रात्री चारही मारेकºयांनी जेवण्यासाठी धाब्यावर जाऊ असे म्हणून मृतकाला काळ््या रंगाच्या शाईन दुचाकीने (एम.एच. २९ / ४४३२) धागणगाव मार्गाने नेले. अशातच अभियांत्रीकी महाविद्यालयासमोर दुचाकी थांबवून धारदार शस्त्राने नितेशच्या छाती व पोटावर सपासप वार करून जागीच ठार केले. त्यानंतर मृतदेह वसंतराव नाईक शासकीय रुग्णालया परिसरात फेकुन देऊन तेथून मारेकरी पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेश रणधिर अन्य कर्मचाºयांसह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. समाधान हिरामण काळे (३२) रा. तलाव फैल यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी चारही आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३०२, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वृत्त लिहेपर्यंत एकाही आरोपीला अटक केली नव्हती. अधिक तपास ठाणेदार दिलीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत, रवी सुरोशे करीत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


four − 4 =