उन्हाळी हंगामासाठी अरुणावती प्रकल्पाचे सिंचन नियोजन

यवतमाळ – अरुणावती प्रकल्प विभाग दिग्रस यांच्यावतीने अरुणावती प्रकल्पाच्या उजवा व डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील तसेच अडाण प्रकल्प कालव्याच्या १५  कि.मी. क्षेत्रातील लाभार्थी शेतकºयाच्या उन्हाळी हंगामासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार अरुणावती प्रकल्पातंर्गत दिग्रस, आर्णी, दारव्हा व वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील लाभार्थीसाठी ३ हजार हेक्टर तर अडाण प्रकल्पाअंतर्गत १ हजार हेक्टर क्षेत्रासाठी सिंचनाचे पाणी देण्याचे नियोजन प्रस्तावित करण्यात आले आहे.
उन्हाळी हंगामासाठी प्रामुख्याने भूईमुंग व इतर उन्हाळी पिकांचा समावेश आहे. तरी उपलब्ध पाणी योग्य प्रकारे वापरण्यासाठी शेतकºयांनी पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन कायर्कारी अभियंता रा.अ.काटपल्लीवार, यांनी केले आहे. ज्या लाभार्थी शेतकºयांकडे मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी थकबाकी शिल्लक आहे. त्यांनी पाणीपट्टी थकबाकीची रक्कम पूर्णपणे भरल्याशिवाय त्यांना उन्हाळी हंगामासाठी पाणी उपलब्ध होणार नाही याची नोंद घ्यावी. लाभक्षेत्रातील शेतकºयांनी पाणी व्यर्थ वाया जाणार नाही यासाठी पाटचाºयांची साफसफाई करुन जलसंपदा विभागास सहकार्य करावे.
उन्हाळी हंगामाचे पाणी वाटपाचे वेळापत्रक तयार करण्याची कायर्वाही सुरु असून पाण्याची पहिली पाळी १ एप्रिल २०१४ रोजी सुरु होईल तर शेवटची पाळी ३० जून  अशी राहील. या बाबतचा सविस्तर कार्यक्रम ग्रामपंचायत व पाणी वाटप संस्थांना कळविण्यात येणार आहे, असे कायर्कारी अभियंता, अरुणावती प्रकल्प विभाग दिग्रस यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− one = 8