उमरखेड – शहरात चोरीच्या घटनेत वाढ झाली असून एकाच रात्री चोरट्याने विविध घटेनत दोन लाखावर डल्ला मारला असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाल आहे.
स्थानिक शिवाजी वॉर्डात राहणाºया संगीता गौतम पडघणे यांच्या घरात चोरट्याने आत प्रवेश केला. कपाटातून एकोणसत्तर हजाराचा मुद्देमाल लंपास केला. त्यामध्ये लाँग गंठन एक तोळा, छोटे गंठन ७ ग्रॅम, कानातले १ ग्रॅम, ३ अंगठया सहा ग्रॅम असा एकूण एकोणसत्तर हजाराचा मुद्देमाल चोरला. अशातच रात्री दीड वाजताच्या सुमारास कपाटाचा आवाज आल्याने महिला जागी झाली. त्यावेळी एक इसम कपाटातून दागिने चोरत होता व एक जण दारामध्ये उभा दिसला. त्यामुळे महिलेने आरडा ओरड केल्याने चोरट्याने तेथून पोबारा केला. तसेच ताजपुरा वार्डातील शे. सादीक शे. करीम यांच्या मालकीचा एम.एच. २६ बी. ४९४७ क्रमांकाचा ट्रक उभा होता. शहरापासून ७ किलोमीटर संगम चिंचोली पर्यंत ट्रक नेऊन डिस्क सह पाच टायर (किंमत १ लाख १० हजार) काढून चोरुन नेले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्घ गुन्हे दाखल केले असून तपास सुरु आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली असून चोरीच्या घटनांनी नागरिकांसह व्यापाºयांचे धाबे दणाणले आहे. पोलिसांनी चोरटयांना अटक करावी व रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.










