उमरसरा येथे तरुणाचा खून

crime_logo
यवतमाळ : सिमेंटच्या बाकावर झोपून असलेल्या एका तरुणाच्या डोक्यावर अज्ञात मारेकर्‍यांनी टणक वस्तूने जोरदार प्रहार करून त्याला जागीच ठार केले. ही घटना मंगळवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास येथील उमरसरा परिसरातील तीन फोटो चौकात घडली. याप्रकरणी चार संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. मात्र घटनेचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.
प्रवीण ऊर्फ पर्‍या शामराव वानखडे (२१) रा. गौळपेंड, ता. दारव्हा असे मृताचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून तो येथील उमरसरा परिसरातील गोवर्धन ले-आऊटमध्ये आई ललिता वानखडे यांच्यासह वास्तव्याला होता. तसेच तणस विक्रीचा व्यवसाय करीत होता. मंगळवारी रात्री तो तीन फोटो चौकातील एका टपरीसमोरील बाकावर झोपून होता. दरम्यान तेथे अज्ञात तिघे जण आले. यावेळी संधी साधून त्यांनी पर्‍यावर टणक वस्तूने प्रहार केला. त्यामध्ये डोक्याला जबर दुखापत होऊन प्रचंड रक्तस्त्राव झाला. त्यातच पर्‍याचा मृत्यू झाला. त्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले. ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ घटनेची माहिती वडगाव रोड पोलिसांना दिली. त्यावरून पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पाठोपाठ उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदने, ठाणेदार बाळकृष्ण जाधव, फौजदार केंद्रे, स्थानिक गुन्हे शाखा आदी पथकेही तेथे पोहोचली. यावेळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. त्यानंतर पर्‍याची आई ललिता वानखडे यांची रितसर तक्रार घेऊन अज्ञात मारेकर्‍यांविरुद्ध वडगाव रोड पोलिसांनी भादंवि ३0२ कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल केला. रात्रीच पोलिसांनी गोपनीय माहितीवरून मारेकर्‍यांचा शोध घेतला. वडगाव रोड पोलिसांनी चार संशयीतांना ताब्यात घेतले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


9 × = twenty seven