एअर एशियाचे विमान बेपत्ता

air-asia-plane
जकार्ता – इंडोनेशियाहून सिंगापूरला निघालेले एअर एशियाचे विमान रविवारी सकाळी बेपत्ता झाले आहे. या विमानात १६२ प्रवासी असून विमानासाठी शोध मोहीमही सुरु झाली आहे.
इंडोनेशियातील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार रविवारी सकाळी पाचच्या सुमारास एअर एशियाचे QZ ८५०१ हे विमान सिंगापूरच्या दिशेने रवाना झाले. मात्र उड्डाणाच्या तासाभरानंतर विमानाचा जकार्ता हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. या विमानात १५५ प्रवासी आणि ७ कर्मचारी असे १६२ जण आहेत. या विमानात एकही भारतीय नाही. विमानासाठी शोध घेण्यासाठी मोहीम सुरु झाली असून खराब हवामानामुळे शोधमोहीमेत अडथळे येत असल्याचे समजते. दरम्यान, सुमात्रा बेटाजवळ बेलितूंग येथे एक विमान कोसळल्याचे वृत्त असले तरी याविषयी अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.  विमान बेपत्ता झाल्याचे समजताच विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांनी विमानतळावर धाव घेतली आहे. प्रवाशांसाठी एअर एशियाने हेल्पलाईनही सुरु केली आहे. यंदाचे वर्ष हे एअरलाईन्स क्षेत्रासाठी दुर्दैवी ठरले आहे.  मलेशियन एअरलाईन्सचे एमएच ३७० हे विमान अजूनही बेपत्ता असून त्याचे बेपत्ता होण्याचे गुढ अजूनही कायम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


8 × = forty