
कोल्हापूर – विशेष चौकशी पथकाच्या (एसआयटी) हाती कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी दोन महत्त्वाचे सुगावे लागले असून दोन ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज एसआयटीला मिळाले आहेत. दोन मोटरसायकल आढळल्या असल्याची माहिती अप्पर पोलिस महासंचालक संजयकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एसआयटीने कॉम्रेड पानसरे यांच्या दोन्ही मारेकर्यांची रेखाचित्रे जारी केले आहेत. मारेकरी २० ते २५ वयोगटातील असू शकतात. तसेच ते कोणत्या मार्गाने पळाले हे स्पष्ट झाल्याचे संजय कुमार यांनी सांगितले यावेळी सांगितले. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने मारेकर्यांना पकडण्यात पोलिसांना यश येईल, असा दावा एसआयटीच्या अधिकार्यांनी केला आहे.









