ऑनर किलिंगचा प्रकार, माहूरात घडलेले दुहेरी हत्याकांड

निलोफरचे वडील, काका आणि चुलत भाऊ अटकेत

IMG-20140912-WA0004IMG-20140911-WA0037

यवतमाळ – माहुर येथे घडलेले दुहेरी खून प्रकरण हा ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचा पर्दाफाश स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी केला आणि या ऑनर किलिंग साठी सुपारी देणाऱ्या मयत निलोफर च्या नातलगांसह ५ जणांना अटक केली आहे. या दुहेरी खून प्रकरणी आता अटक आरोपीतांची संख्या ११ झाली आहे.
१० सप्टेम्बर २०१४ रोजी माहूर च्या रामगढ किल्ल्यात २२ वर्षीय निलोफर बेग या पुसद येथील युवती सह तिचा प्रियकर शाहरुख फेरोज खान पठाण वय २३ या युवकाचा असे दोन मृतदेह मिळाले. जिल्ह्यात आणि राज्यात एकच खळबळ उडाली. या दुहेरी हत्याकांडा मुले पोलीसान समोर मोठे आव्हान होते. सुता वरून स्वर्ग गाठण्यात ख्याती असलेल्या पोलिसांनी या प्रकरणी जोरदार प्रयत्न सुरु ठेवले. पोलिस अधीक्षक परमजीतसिंह दहिया, अपर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीधर पवार यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक अण्णा डोईफोडे पोलिस कर्मचारी बळीराम दासरे, सय्यद फहीम, दत्तराम चव्हाण, सुधाकर कदम, पिराजी गायकवाड, शिंदे, दत्ता जाधव या टीम ने परिश्रम घेऊन अगोदर ५ जणांना पकडले त्यांची नावे राजू उर्फ राजा रघुनाथ गाडेकर वय 20, शेख जावेद उर्फ पेंटर शेख हुसेन व 38,रंगराव शामराव बाबटकर वय 25, शेषराव उर्फ पिंटू शामराव बाबटकर वय 19 आणि कृष्णा उर्फ बाबू मारोतराव शिंदे वय 25 अशी आहेत. या प्रकरणातील रघू रोकडा उर्फ डॉन रघू नाना पळसकर यास माहूर पोलिसांनी पकडले.
५ नोहेंबर रोजी रात्री अण्णा डोईफोडे आणि त्यांच्या टीमने पुसद येथील सयद अन्वरअली सयद अथरअली, माहूर येथील खैसर मिर्झा बहादूर मिर्झा, फुल सांगवी ता. महागाव येथील मिर्झा खालेद बेग मिर्झा कमर बेग, विकार अहमद नवाब अहमद, नवाबजानी कमर बेग या पाच लोकांना पकडले. आज या पाच जणांना माहूर न्यायालयात हजर केले जाणार आहे. आता या निलोफर आणि शाहरुख या प्रेमी युगल हत्याकांडात अटक आरोपींची संख्या ११ झाली आहे.
प्राप्त माहिती नुसार मोठे खलबत रचून, अत्यंत सुनियोजीत कट रचून हे हत्याकांड घडवण्यात आले होते. आपल्या खानदानीच्या तोडीचे खानदान (कुटुंब) शाहरुखचे नाही या साठी आपल्या मुलगी निलोफर सह शाहरुख चा काटा काढण्यात आला. निलोफर आणि शाहरुख दोघे तंत्निकेतन पुसद येथे पदविका अभ्यासक्रमाला सोबत होते. अगोदर एकदा निलोफरने शाहरुख ची तक्रार सुद्धा केली होती. तेव्हा शाहरुख च्या काकाने हे प्रकरण मिटवले होते. तंत्निकेतन पदविका अभ्यासक्रमत निलोफर उत्तीर्ण झाली आणि शाहरुख नापास झाला. निलोफर पुसदच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत होती. शाहरुख च्या काकाने निलोफरच्या घरा समोर पुसद मध्ये घर घेतले होते. शाहरुख तेथेच राहत होता.
निलोफरने एकदा तक्रार केल्या नंतर सुद्धा शाहरुखने तिच्या सोबत सुत जमवलेच आणि दोघांचे प्रेम प्रकरण हळू हळू आकार घेत होते. निलोफर च्या कुटुंबियांना हि प्रेम कहाणी पसंद नव्हती. या दोघांचा काटा काढण्यासाठी एक शाश्वत खलबत रचले गेले. त्यात निलोफर च्या कुटुंबाने कोठेच भ्रमणध्वनी चा वापर केला नाही. प्रत्यक्ष भेटी गाठी घेऊन हा कट रचण्यात आला. दरम्यान शाहरुखला यवतमाळ येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात पहिल्या वर्षात प्रवेश मिळाला.
९ सप्टेम्बर २०१४ शाहरुख यवतमाळ येथुन आपल्या चारचाकी गाडीत आला आणि नेहमी प्रमाणे सोयीस्कर माहूर गडावर प्रेमाच्या आण भाका घेण्यासाठी गेला. अगोदरच नियोजन असल्याने निलोफरचे काही नातलग नांदेडला आले. आणि ९ सप्टेम्बरला सायंकाळी पुसद पोलिस ठाण्यात निलोफारची मिसिंग (हरवल्याची) तक्रार दाखल झाली. दुसऱ्या दिवशी निलोफर आणि शाहरुखचे मुडदे सापडले. असा सुनियोजित कट रचून प्रेमी युगला चे खून.
स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी हे दुहेरी खून प्रकरण उगडकीस आणले. या खुना साठी अगोदर अटक केलेल्या ५ जणांना माहूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्र. ती. खराटे यांनी ७ नोहेंबर पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. काळ पकडलेल्या ५ जणांना आज माहूर न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती सांगण्यात आली. पकडण्यात आलेला विकार अहमद हा या दुहेरी खून प्रकरणाचा फिर्यादी आणि निलोफर चा चुलत भाऊ आहे. मिर्झा खालेद बेग हे निलोफरचे वडील आहेत. नवाब अली हे तिचे काका आहेत. सय्यद अन्वरअली हा सरकारी कंत्राटदार आहे. यानेच माहूर पोलिस ठाण्याची इमारत बांधली असल्याचे सांगण्यात आले. तर खैसर मिर्झा हा अन्वरअली चा सहकारी कंत्राटदार आहे अशी माहिती जाणकार सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रा सारख्या प्रगत राज्यात सुद्धा ऑनर किलीग घडते हे या प्रेमी युगलाच्या दुहेरी हत्याकांडातून दिसले, हेच खरे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× 9 = eighty one