कट्टर माओवादी कमांडर पूर्णा हुल्का ठार

index
कोरापूट – कट्टर माओवादी कमांडर पूर्णा हुल्का सुरक्षापथकांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला आहे. ओडिसाच्या कोरापूट जिल्ह्यातील नारायणपटणा भागात रविवारी मध्यरात्री माओवादी आणि रक्षापथकांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत पूर्णा हुल्का ठार झाला.
आंध्रप्रदेश-ओडिसामधील अनेक नक्षलवादी कारवायांचा तो सूत्रधार होता. श्रीकाकुल्लम-कोरापटू डिव्हीजनचा तो कमांडर होता. ओडिसा सरकारने त्याच्यावर एक लाख रुपयाचे बक्षीस ठेवले होते. हत्येसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद त्याच्या नावावर होती. नारायणपटना भागात पूर्णा त्याच्या साथीदारांच्या मदतीने घातपाती कारवाया करणार असल्याची पोलिसांना गुप्तचरांकडून माहिती मिळाली होती. त्यामुळे सुरक्षापथकांनी पूर्णा जेथे येणार होता तेथे आधीपासूनच सापळा रचून ठेवला होता. पूर्णा आणि त्याचे साथीदार तेथे आल्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्यांना शरण येण्याचे आवाहन केले. मात्र त्यांनी उलट सुरक्षापथकांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. सुरक्षारक्षकांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पूर्णा ठार झाला. अंधाराचा फायदा घेऊन त्याच्याबरोबर असणारे सहकारी तेथून पसार झाले. घटनास्थळावरुन पोलिसांनी दोन देशी बनावटीच्या पिस्तुल, बंदुका आणि अन्य माओवादी साहित्य जप्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


2 + one =