कमी दाबाच्या ठिकाणी नवीन विज उपकेंद्राचे काम हाती घ्या – केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर

unnamed
यवतमाळ: विजेच्या कमी दाबामुळे शेतकरी तथा सर्वसामान्य नागरिकांना विविध अडचणींना समोर जावे लागते. ही समस्या सोडविण्यासाठी ज्या ठिकाणी कमी दाबाचा विज पुरवठा होतो. तेथे नवीन विज उपकेंद्र उभारणीचे काम तातडीणे हाती घ्या, अशी सूचना केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केल्या. अहिर यांनी विश्रमभवन येथे जिल्ह्यातील विज वितरणच्या प्रश्नांवर विद्युत विज वितरण व पारेषण अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला आ. मदन येरावार, आ. राजू तोडसाम, आ. संजीव रेड्डी बोदकुरवार, आ. राजेंद्र नजरधने, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, विज वितरणचे अधिक्षक अभियंता बाबासाहेब जाधव, कार्यकारी अभियंता तगडपल्लीवार, नगराळे, कांबळे, पुरकर, हितेश शेट, राजू डांगे आदी उपस्थित होते. यावेळी अहिर यांनी नवीन बांधकामाधीन उपकेंद्राचा आढावा घेतला. कृषी पंपांची प्रलंबित जोडणे तातडीणे करण्याबाबत त्यांनी सूचविले. अवैद्य विज पुरवठ्याचे कनेक्शन नियमित करुण ग्राहकांना विज पुरवठा करण्यात यावा. अनेक ग्राहकांना अवास्तव बिल दिले जाते, अशा ग्राहकांच्या तक्रारींचे ताबडतोब निवारण केले जावे, पारेषण व वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपसात समन्वय ठेवून काम करावे, काही केंद्र उपकेंद्र पूर्ण झाले असल्यास ते तात्काळ सुरु करण्याच्या सूचनाही अहिर यांनी केल्या.विज पुरवठ्याच्या संदर्भात कंपणीकडून वारंवार निवीदा कढल्या जाते. मोठ्या रकमेच्या  निविदा काढण्याऐवजी कमी किमतीच्या निविदा अधिक्षक अभियंता स्तरावर काढण्याकरीता संबंधितांना अधिकार बहाल करण्याबाबत त्यांनी सूचना केली. कंत्राटदार वेळेत कामे पूर्ण करत नसतील तर त्यांच्यावर कार्यवाही करा, असे त्यांनी सूचविले. जिल्ह्यातील विज वितरण व्यवस्था, देखभाल व दुरुस्ती, प्रलंबित कृषी पंपांची जोडणी आदीबाबत त्यांनी चर्चा केली. बैठकीला विद्युत निरिक्षक राजू महालक्ष्मे, सहाय्यक विद्युत निरिक्षक प्रदिप तंबाखे, शाखा अभियंता पानतावणे तसेच प्र.मा. मुळे, एस.पी.राठोड, मनोज बोद्रे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× 5 = thirty five