कराची विमानतळावर पुन्हा दहशतवादी हल्ला

terror
कराची – पाकिस्तानमध्ये कराची येथील जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन दिवसात दुस-यांदा दहशतवादी हल्ला झाला आहे. यावेळी विमानतळ सुरक्षा पथकाचा कॅम्प असलेल्या परिसरात एका चौकीवर तुफान गोळीबार करत सहा दहशतवाद्यांनी हल्ला सुरू केला. दहशतवादी हल्ल्यात पाचजण ठार झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
याआधी रविवारी रात्री उशिरा दहा दहशतवाद्यांनी विमानतळावर हल्ला केला होता. सुरक्षा पथक आणि दहशतवादी यांच्यात तब्बल १३ तास चाललेल्या चकमकीअंती दहा दहशतवाद्यांसह ३७ जण ठार झाले, अशी माहिती एएफपी या वृत्तसंस्थेने दिली. या घटनेनंतर आज (मंगळवारी) पुन्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. रविवारी हल्ला करणा-या दहशतवाद्यांचा उद्देश एखादे विमान ताब्यात घेऊन आपल्या मागण्या मान्य करुन घेण्याचा होता. मात्र हा प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे आज दहशतवाद्यांनी पुन्हा हल्ला केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या विमानतळ सुरक्षा पथक (एएसएफ) आणि दहशतवादी यांच्यात धुमश्चक्री सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


nine × 9 =