काँग्रेसचा विधिमंडळ नेता हायकमांड निवडणार

index
मुंबई- काँग्रेसचा विधिमंडळ नेता निवडीसाठी झालेल्या बैठकीत अखेर विधिमंडळ नेता निवडण्याचे सर्वाधिकार काँग्रेसच्या हायकमांडना देण्यात आले. राज्यातील विधिमंडळ नेता निवडीसाठी काँग्रेसच्या आमदारांची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत विधिमंडळ नेता पदाच्या शर्यतीत अनेक जेष्ठ नेते आणि मंत्री असल्याने अखेर विधिमंडळ नेता निवड करण्याचा सर्वाधिकार काँग्रेसचे हायकमांड घेतील असा निर्णय घेण्यात आला. लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गे आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मोहन प्रकाश यांच्या निरीक्षणाखाली ही बैठक झाली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपण विधिमंडळ नेते पदाच्या शर्यतीत नसल्याचे गुरुवारी सकाळी सांगितले. मात्र काँग्रेस पक्षातील अनेक जेष्ठ नेते आणि मंत्री पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील हे या शर्यतीत आहेत. त्यामुळे गुरुवारी झालेल्या विधिमंडळ नेता निवडीसाठी काँग्रेस आमदारांच्या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही.
नवनिर्वाचित ४२ आमदारांपैकी ३९ आमदार आणि २२ विधान परिषदेत असलेले आमदार या बैठकीला उपस्थित होते. कालिदास कोळंबकर, सुरुपसिंह नाईक आणि आरिफ मोहम्मद नसीम खान काही कारणास्तव बैठकीला हजर राहू शकले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


4 − = two