यवतमाळ, दि. ३ – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस आज मंगळवारी जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी त्यांचा ताफा जिल्हा परिषदेत पोहोचताच काँग्रेस पदाधिकाºयांनी जोरदार निदर्शने केली. तसेच आप व शेतकरी बचाव विदर्भ समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करीत शेतकºयांना मदतीची मागणी लाऊन धरली.
विधानसभा निवडणूकीत आश्वासन देणाºया युती सरकारकडून शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षापासून असंमानी संकट झेलणाºया शेतकºयावर यंदाही निसर्गाने अवकृपा दाखविली आहे. खरीप हंगामात कोलमडलेल्या शेतकºयाला रब्बीतही निसर्ग रडवित आहे. अशा परीस्थितीत सरकारने शेतकºयाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याची गरज असताना, सरकार शेतकरी विरोधी धोरण अवलंबित आहे. भूमी अधिग्रहण कायद्यात दुरूस्ती करून शासनाने शेतकºयांचा हक्क हिसकावला आहे. दुष्काळाची तुटपूंजी मदत देण्यात येत असून, मदतीलाही दोन हेक्टरची आडकाठी घालून ५० टक्के शेतकºयांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस, आप व शेतकरी बचाव विदर्भ समितीने आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हा परिषदेत आगमन होताच जोरदार घोषणाबाजी सुरू केली. आप व शेतकरी बचाव समितीच्या कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी जात असताना, यावेळी पोलिसांनी त्यांना मज्जाव केल्याने कार्यकर्ते व पोलिसांची चांगलीच झटपट झाली. दुष्काळाच्या आगीत होरपळत असलेल्या शेतकºयांना २५ हजार हेक्टरी मदत देण्यात यावी, दोन दिवसापूर्वी वादळी व गारपीटीच्या तडाख्यात उद्घवस्त झालेल्या शेतकºयांना मदत देण्यात यावी अशी मागणी यावेळी लाऊन धरण्यात आली. निवेदन देतेवेळी राहुल ठाकरे, अशोक बोबडे, दिनेश गोगरकर, बाळासाहेब मांगूळकर, देवानंद पवार, नरेंद्र ठाकरे, चंदू चौधरी, माजी आ. विजया धोटे आदी उपस्थित होते.










