काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांचे निधन

images
मुंबई – माजी पेट्रोलियम मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांचे सोमवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.
मुरली देवरा यांचे पार्थिव आज दुपारी १२ ते दोन वाजेपर्यंत मुंबई काँग्रेस कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर चार वाजता गिरगावमधील चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांचे गांधी कुटुंबाशी तसेच उद्योगपती मुकेश अंबानीसोबत त्यांचे जवळचे संबंध होते. काँग्रेसचे निष्ठावान नेते अशी त्यांची ओळख होती. १९६८ पासून काँग्रेसचे नगरसेवक म्हणून त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला.  त्यानंतर १९७७ ते १९७८ दरम्यान ते मुंबईचे महापौर होते. दक्षिण मुंबईतून ते चार वेळा ते संसदेचे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्यामुळेच दक्षिण मुंबई हा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जातो. २००४ मध्ये राज्यसभेत खासदार होते. यूपीए सरकारच्या कार्यकाळात देवरा यांनी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रिपद भूषवले होते. तसेच जुलै २०११ मध्ये त्यांनी दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रीपदाचा कार्यभारही सांभाळला होता. दोन दशकाहून अधिक काळ त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले होते.मुरली देवरा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली. मुरली देवरा हे त्यांच्या शांत स्वभावामुळे पक्षात लोकप्रिय होते. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. कालच मी देवरा यांच्या कुटुंबीयांकडे त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. आज या बातमीमुळे खूप दु:ख होत आहे. असे मोदी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


3 + = ten