काँग्रेसच्या कार्यकाळात देशाचा विकास – दिग्विजयसिंह

99569
यवतमाळ – काँग्रेसला भ्रष्टाचारी संबोधणाºयाभाजपने अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून जनतेचा भ्रमनिरास केला आहे. काँग्रेसच्या कार्यकाळातच देशाचा विकास झाला असून त्याचे श्रेय लाटण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असल्याचा आरोप काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी दिग्विजयसिंह यांनी केला.  येथील काँग्रेस कमिटीच्याजिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते.
यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल ठाकरे यांच्या प्रचारार्थ ते आले होते.गेल्या साठ वर्षात काँग्रेसने देशाचे वाटोळे केले असल्याचे आरोप भाजप करीत आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरीके त भारत मजबूत आणि विकसित देश असल्याचे बोलतात. मग चार महिन्यात देशाचा विकास झाला का असा प्रश्न दिग्विजयसिंहयांनी उपस्थित केला. धर्माच्या नावावर देशाचे तुकडे करून जातीय तेढ निर्माण करण्याचे काम भाजप करीत असून, त्याला खतपाणी घालण्याचे काम संघ करीत आहे. पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत लोकांना उल्लू बनविण्याचे काम करीत असल्याची तोफ डागली. गुजरात विकासाचे मॉडेल म्हणून मिरविण्यात येत आहे. कारण त्याचा प्रचार तसा करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र महाराष्टÑ गुजरातपेक्षा कितीतरी पटीने समोर आहे. संघ आपली विचारधारा वाढविण्याऐवजी मोदीरिझ्यम वाढवित आहे. महाराष्टÑात काँग्रेस राष्टÑवादी काँग्रेसच्या दबावातून मुक्त झाली असून, काँग्रेसच विकास करणारा पक्ष असल्याचे दिग्विजयसिंह म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, आ. हरिभाऊ राठोड उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ 9 = thirteen