काँग्रेस-भाजपमध्ये ४७ जागांवर अटीतटीचा सामना

Poll-540
नवी दिल्ली – निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये ४७ जागांवर अटीतटीची लढत झाली होती.
फार थोडया फरकाने या जागांवरुन काँग्रेस आणि भाजपचे उमदेवार विजयी झाले होते. थोडा जास्त जोर लावला असता तर, चित्र वेगळे दिसले असते अशी त्यावेळची दोन्ही पक्षांची भावना होती.
त्यामुळे या ४७ जागांवर यावेळी दोन्ही पक्षांनी नवीन उमेदवारांना प्राधान्य दिले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या जागांवरील निकाल काँग्रेस आणि भाजप दोघांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. २००९ मध्ये भाजप आणि काँग्रेसने लढवलेल्या ३४ जागा अशा होत्या जिथे उमेदवार तीन टक्क्याहून कमी मताधिक्क्याने निवडून आले होते.
यंदा दोन्ही पक्षांनी ४७ पैकी तेरा जागांवर उमेदवार कायम ठेवले आहेत. आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारीनुसार रांची, गुलबर्गा, इंदूर, गुरदासपूर आणि सुंदरगडमध्ये उमेदवार कायम ठेवण्यात आले आहेत. २००९ मध्ये अटीतटीची लढत झालेल्या ४७ जागांपैकी २८ काँग्रेसने तर, १९ भाजपने जिंकल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ four = 8